“वसुंधरा बचाव प्लॅस्टिक कॅरीबॅग हटाओ” महिलांनी दिला जागदिक महिला दिनी नारा

नागपूर

नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त “नितीन गडकरी प्रेरणा मंच” द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वंदनीय सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणा द्वारे शिक्षित करून त्यांना पुरूषांचे बरोबरीने मानाचे स्थान मिळवून दिले. आजच्या स्पर्धेच्या युगात स्त्रिला आपल्या संसारात आर्थिक भार उचलणे आवश्यक झाले आहे. असंख्य महिलांना नोकरी अथवा व्यवसाय करणे गरजेचे आहे. परंतु अपूर्ण शिक्षण घरची हालाकिची परिस्थीती मुळे सर्वांनाच नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकत नाही.

नितीन गडकरी प्रेरणा मंच द्वारा महिलांसाठी निशुःल्क सिलाई कढ़ाई प्रशिक्षणा द्वारे महिलांना रोजगार चि संधी स्वबळावर करून देण्याचा प्रयत्न करण्यात येइल. निशुःल्क प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन आज जागतिक महिला दिनी सुरवात करण्यात आली. या प्रशिक्षण वर्गात महिलांना शिवण केलेचे प्राथमिक शिक्षण ड्रेश डिझायनर श्रीमति ऊषा चौहान अणि कु. निकिता यांनी मोठ्या संख्येने उपस्थित महिलांना दिले.

निःशुल्क सिलाई प्रशिक्षण वर्गात बचत गटातील महिंलाकडून कापडी पिशव्या मोठ्या प्रमाणात शिवून त्याचे वितरण आठवाडी बाजारां मध्ये करण्यात येणार आहे.

वसुंधरा (सृष्टि) बचाव….. प्लॉस्टीक कॅरीबॅग हटाव….. असा संदेश जनतेला देण्याची प्रतिज्ञा कार्यक्रमात उपस्थित महिलांनी घेतली. 23 जून 2018 रोजी प्लॉस्टीक कॅरीबॅग बंदीचा निर्णय महाराष्ट्र सरकार ने घोषित करून त्याची अंमलबजावणी सुरू केली परंतु सामान्य गरीब विकेतांना (हॉकर्स) त्यांचा सक्षम पर्याय उपलब्ध केलेला नाही त्यामुळे आजही छोटे विक्रेते लपुन प्लॉस्टीक कॅरीबॅग चा वापर करित आहे. ग्राहकाही आपल्या बरोबर घरून कापडी पिशवी बाजारात नेत नाही. नाइलाजाने विक्रेता व छोटे दुकानदार लपुन प्लॉस्टीक कॅरीबॅग देणे घेणे करतात. यामुळे पर्यावरणाला विषयुक्त रासायनिक दुषपरिमानाला समोर जावे लागते.

प्लॉस्टीक कॅरीबॅग हटाव मुहिम अंतर्गत या प्रशिक्षण वर्गात मोठ्या प्रमाणात कापड़ी पिशव्याची निर्मिती करण्यात येणार आहे. आठवडी बाजारात छोटे दुकानदार व्यापारांना अणि ग्राहकांना विनंती करून प्लॉस्टीक कॅरीबॅग वापरण्या विरूध्द् जागृति करण्यास कापड़ी पिशव्या निशुःल्क वाटप करण्यात येणार आहे. बाजारात जातांना आपल्या बरोबर पिशवी बरोबर नेण्याची विंनती केली जाईल. ग्राहकांना विक्रेते प्लॉस्टीक कॅरीबॅग देण्यास नम्रपणे नकार देतिल.

पर्यावरण रक्षा…. जीवन सुरक्षा…” हा संदेश नितीन गडकरी प्रेरणा मंच चे माध्यमातुन देण्यास चित्र रथ तैयार करण्यात आला आहे हा रथ शहरातिल बाजारात फिरून जनजागृति करणार आहे. या सोबत कापड़ी पिशवी निशुःल्क वितरण करण्यात येईल, असे मंच चे अध्यक्ष अनिल चौहान यांनी आपल्या भाषणात सांगितले.

कार्याकमाचे अध्यक्ष स्थानी प्रभाग 17 चे नगरसेवक श्री.विजय चुटेले होते यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांना प्रशिक्षण वर्गात मोठ्या संख्येने सहभागी होण्यास विंनती केली. प्लॉस्टीक कॅरीबॅग हटाव मोहिम यशस्वी करण्यास पुढाकार घेण्याचा संकल्प केला. प्रशिक्षण वर्ग स्व चंदाबाई चावरिया प्रयोगशाळेया सभागृहात करण्याची घोषणा केली. कार्यक्रमात प्रमुख अथिती म्हणुन उपस्थित वयोवृध्द महिला कुशुमताई या होत्या आरती यांनी उपस्थिम महिलांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यास मंचचे श्री राजेश पुरोहित आणि परिणय यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

अधिक वाचा : महिला दिनानिमित्त महापालिकेत विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

Comments

comments