नागपूर : जपानची प्रसिद्ध कंपनी ‘सोनी’नं एक खास एअर कंडीशनर (AC)उपकरण बाजारात आणलं आहे. ‘रिऑन पॉकेट‘ (Reon Pocket) असं या उपकरणाचं नाव असून हा एसी इतका छोटा आहे की, परिधान केलेल्या कपड्यावर सहज बसवता येणार आहे. त्यामुळं आता उकाड्याची चिंता करणं सोडून द्या. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे थंडीच्या दिवसात या एसीच्या मदतीनं तुम्हाला गरम हवा मिळू शकते . या एअर कंडीशनरला मोबाइलद्वारे कंट्रोल करता येणार असून वापरण्याठी हे सोप्पं आहे.
सोनीने या एअर कंडीशनरला क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलं आहे. पाठीवर सहज लावता येईल असं हे उपकरण असून सध्यातरी हे उपकरण केवळ पुरुषांसाठी उपलब्ध आहे. या उपकरणाचं तापमान मोबाइलमधील अॅपच्या साहाय्यानं कमी जास्त करता येणार आहे. एका विशिष्ट एसी पेल्टियर घटकापासून हे उपकरण तयार करण्यात आलं आहे. ज्यामुळं हे उपकरण लगेच थंड आणि गरम होण्यास मदत होते. या घटकाचा वापर कार किंवा कूलर्समध्ये केला जातो.
या स्मार्ट उपकरणांत लिथियम आयर्न बॅटरीचा वापर करण्यात आला असून २ तास चार्ज केल्यानंतर दिवसभर याचा वापर करता येणार आहे. हा छोटा एसी ब्लूटूथ ५.० LE कनेक्टेड फोनला सपोर्ट करतो.