नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीबाबत काँग्रेस लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सगळीकडे प्रचार, सभा, आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका यांची धामधूम असताना, काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला आहे. काँग्रेस मोदींच्या संपत्तीबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज काँग्रेस पत्रकार परिषद घेणार आहे. यातून नेमकी काय माहिती समोर येते, साकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतान पार पडले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 तारखेला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याने, संपूर्ण देशाचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.
काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय स्तरावरील दोन्ही पक्षांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस मोदींवर राफेल घोटाळ्याचा आरोप करत आहे, तर मोदी काँग्रेसवर गेल्या 70 वर्षात काहीच विकास केला नसल्याचा आरोप करत आहे. वेगवेगळ्या आरोपांनी निवडणुकीला रंगत आली आहे.
पत्रकार परिषदेतील महत्तावाचे मुद्दे
मोदींनी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली, निवडणूक आयोगाने कारवाई करावी.
2000 सालानंतर गुजरातमध्ये आमदार, खासदार, सरकारी अधिकारी कुणालाच भूखंड दिला गेला नाही, असे भाजप खासदार मिनाक्षी लेखींनी कोर्टात सांगितले होते, मग मोदींना कसा मिळाला?
मोदींनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत चुकीची माहिती दिली.
अधिक वाचा : हिंगोलीत सहा ‘सुभाष वानखेडे’ निवडणूक रिंगणात