महिला उद्योजिका मेळावा : हास्य कवी संमेलनाने आणली रंगत

नागपूर

नागपूर : नागपूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती व समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या पाचव्या दिवशी उद्घाटन कार्यक्रमात पोलिसांच्या दामिनी पथकाची उपस्थिती लक्षणीय ठरली. त्यांच्या उपस्थितीने उद्योजिका म्हणून मेळाव्यात सहभागी झालेल्या महिलांना नवी ऊर्जा मिळाली. सर्व उद्योजिकांच्या वतीने दामिनी पथकातील सर्व महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला.

पाचव्या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी मंचावर महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या दिव्या धुरडे, सरिता कावरे, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नगरसेविका मनिषा कोठे, सुमेधा देशपांडे, जयश्री वाडीभस्मे, नगरसेवक संदीप गवई, श्री. हेडाऊ उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर म्हणाल्या, महिला उद्योजिका मेळावा महिलांना स्वत्वाची जाणीव करून देणारा आहे. या निमित्ताने स्त्री घराबाहेर पडली आणि आत्मनिर्भर झाली. नागपूर महानगरपालिकेने मेळाव्याच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले याचा अभिमान आहे. पोलिसांचे दामिनी पथक महिलांना मदत देण्यासाठी २४ तास तत्पर असते. दामिनी पथकातील महिला पोलिस घरची जबाबदारी आणि समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडतात. या महिला पोलिसांचा सत्कार करून त्यांच्याही कार्याला प्रोत्साहित केले. याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.

हास्य कवी संमेलनाने आणली रंगत

मनोरंजन कार्यक्रमाच्या मालिकेत गुरूवारी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कवी सुनील सावरा (मुंबई), किरण जोशी (अमरावती), कपिल जैन (यवतमाळ), अनिल मालोकर (नागपूर), सरिता सरोज (गोंदिया) यांनी हास्य, वीर, श्रृंगार रसातील कवितांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. कवी संमेलनाचे संचालन किरण जोशी यांनी केले. त्यांनीही आपल्या अनोख्या शैलीतून आणि कवितांनी रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले.

अधिक वाचा : महिला उद्योजिका मेळावा : दीपाली साठेंच्या संगीत रजनीने रंगला दुसरा दिवस

Comments

comments