नागपूर : दारू पिऊन नेहमी वाद घालणाऱ्या पतीने क्षुल्लक कारणावरून पत्नीची निर्घृण हत्या केली. ही घटना सावनेर तालुक्यातील खामगाव येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. अंगद केवलदास महंत (६२) असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी करुणा अंगद महंत (५५) असे मृत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अंगद महंत याला अटक केली आहे. घटनेच्या दिवशी करुणा या पाणी भरण्यासाठी मध्यरात्रीदरम्यान उठल्या होत्या.
याच वेळी अंगद यांनी त्यांच्यासोबत शुल्लक कारणावरुन वाद घातला. दोघांमधील वाद वाढल्यानंतर अंगद यांनी पत्नीवर विळ्याने हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अधिक वाचा : ‘फनी’ ओडीशात धडकले; वेग ताशी २४० किमी