‘फनी’ ओडीशात धडकले; वेग ताशी २४० किमी

Date:

नागपूर : १९९९च्या सुपर चक्रीवादळानंतरचे सर्वांत विध्वंसक असणारे फनी वादळ आज, शुक्रवारी ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. या वेळ चक्रीवादळाचा ताशी वेग १८५ किमी इतका होता. मात्र काही वेळानंतर त्यात वाढ होत तो २४० प्रति किमी इतका झाला आहे. ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात पावसालाही सुरुवात झाली आहे पुरीच्या किनारपट्टीवर अनेक झाडे कोसळल्याचे वृत्त आहे. यात पुरीमधील सखीगोपाळ भागात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ओडिशात ५ ते ६ तास वादळाचा परिणाम जाणवणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

या चक्रीवादळामुळे मनुष्यहानी टाळता यावी यासाठी राज्याच्या समुद्रकिनाऱ्याच्या आसपास राहणाऱ्या सुमारे लाखो नागरिकांना तेथून स्थलांतरित करण्यात आले आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. या संदर्भात दिलासा देणारे वृत्त म्हणजे या चक्रीवादळाचा वेग सकाळी ११ वाजल्यानंतर मंदावणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून केंद्रीय गृहमंत्रालयाने १९३८ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला. या बरोबरत आंध्र प्रदेशातील विखाखापट्टणमच्या किनारपट्टीवरही जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज रात्री फनी चक्रीवादळ बंगालमध्ये धडकरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

ओडिशासह आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना ‘फनी’चा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ओडिशातील पुरीनजीकच्या किनारी शुक्रवारी सध्याकाळी सुमारे ताशी १७० ते १८० किमी वेगाने हे वादळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. वादळाचा वेग ताशी २०० किमीपर्यंतही जाऊ शकतो, असे हवामानतज्ज्ञांनी म्हटले होते. वादळाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या ओडिशातील एकूण १३ जिल्ह्यांमधील सुमारे साडेअकरा लाख नागरिकांना फनीचा धोका असल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘फनी’च्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यात त्यांनी या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. दुसरीकडे नागरी हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी सर्व संबंधित विमानतळ प्राधिकरणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘एनडीआरएफ’ची ८१ पथके तैनात

‘फनी’च्या तडाख्याचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती कृती दलाची (एनडीआरएफ) ८१ पथके तैनात करण्यात आली आहेत. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागांत जवळपास ५० पथक यापूर्वीच सज्ज करण्यात आली आहेत, तर अन्य ३१ पथकेही तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये चार हजारहून अधिक विशेष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असे ‘एनडीआरएफ’चे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी सांगितले.

९५ गाड्या रद्द

‘फनी’च्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांत सुमारे ९५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द किंवा अन्य मार्गांवर वळवण्यात आलेल्या गाड्यांतील प्रवाशांनी निर्धारित वेळेनंतर तीन दिवसांत पैशाची मागणी केल्यास त्यांना पूर्ण परतावा दिला जाईल, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. रेल्वेने बुधवारी ८१ गाड्या रद्द केल्या होत्या.

अधिक वाचा : ‘भाजपचा फायदा करण्यापेक्षा मरण पत्करेन’

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...