इंस्टट टेक्स्ट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप ला यावर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रायव्हेसी पॉलिसीवरून टीकेचा सामना करावा लागत आहे. व्हॉट्सअॅपची नवीन पॉलिसी याआधी फेब्रुवारी महिन्यात लागू होणार होती, मात्र आता १५ मे २०२१ ला लागू होणार आहे. विवाद निर्माण झाल्यानंतर कंपनीने नवीन प्रायव्हेसी पॉलिसी लागू करण्याची तारीख टाळली होती. नवीन पॉलिसीबाबत कंपनी सातत्याने यूजरला नॉटिफिकेशन पाठवत आहे. मात्र, जर तुम्ही ही पॉलिसी स्विकारली नाही तर ?याबाबत जाणून घेऊया.
कंपनीने अनेकदा पॉलिसी लागू करण्याची तारीख टाळली आहे, मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्याची शक्यता कमी आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की १५ मे पर्यंत जे यूजर पॉलिसी स्विकारणार नाहीत, त्यांना मेसेज करता येणार नाही. थोडक्यात, जोपर्यंत पॉलिसी स्विकारत नाही, तोपर्यंत व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.
१२० दिवसांनी अकाउंट बंद
व्हॉट्सअॅपने सांगितले आहे की अटी मान्य करत नाही तोपर्यंत यूजर मेसेज सेंड अथवा रिसिव्ह करू शकत नाही. जे या नवीन अटींचा स्विकार करणार नाही, त्यांचे अकाउंट इनएक्टिव्ह होईल व १२० दिवसानंतर बंद होऊन जाईल.नवीन पॉलिसीला सर्वाधिक विरोध भारतातून होत आहे. भारतात कंपनीचे सर्वाधिक यूजर आहेत. व्हॉट्सअॅप नवीन पॉलिसी अंतर्गत पॅरेंट कंपनी फेसबुकला अधिक डेटा शेअर करत असल्याचा आरोप आहे. मात्र व्हॉट्सअॅपने मात्र हे आरोप फेटाळत, अपडेट बिझनेस अकाउंटशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, यूरोपमध्ये आधीपासूनच वेगळे कायदे असल्याने तेथे व्हॉट्सअॅपच्या अटी लागू होणार नाहीत. व्हॉट्सअॅप यूजरच्या आयपी अॅड्रेससह अनेक माहिती फेसबुकला शेअर करते.