Prateek Gandhi च्या नवीन वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

Prateek Gandhi

अभिनेता Prateek Gandhi सोनीलिव्ह वरील ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमधून प्रकाश झोतात आला. आता प्रतीक आणखी एका नव्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. त्याच्या या आगामी वेब सीरिजचं नाव ‘विठ्ठल तिडी’ आहे. ही एक गुजराती वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘विठ्ठल तिडी’चा ट्रेलर प्रचंड व्हायरल झाला आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर Prateek Gandhi ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये प्रतीक एका जुगार खेळणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. तो आधी गावात जुगार खेळतो आणि नंतर शहरात येऊन एक मोठा जुगारी होता.

प्रतीकने ‘स्कॅम १९९२’ मध्ये केलेल्या भूमिकेचे अजूनही कौतूक केले जाते. या सीरिजमध्ये त्याने हंसल मेहताची भूमिका साकारली होती. या वेब सीरिजनंतर त्याचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टची प्रतिक्षा करत होते. आता शेवटी त्याच्या चाहत्यांना प्रतीकला एका नव्या रुपात पाहता येणार आहे.

दरम्यान, ‘विठ्ठल तिडी’ या वेब सीरिजचे दिग्दर्शन अभिषेक जैन यांनी केले आहे. तर भार्गव पुरोहित यांनी ही कहाणी लिहली आहे. ही वेब सीरिज ७ मे रोजी Oho Gujarati या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.