IPL 2021 बंद होणार का? BCCIच्या अधिकाऱ्यानं दिलं उत्तर जानूं घ्या.

IPL 2021

करोना विषाणूने IPL २०२१ मध्येही धडक दिली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात  सोमवारी होणारा सामना पुढे ढकलण्यात आला असून लवकरच या सामन्याची नवीन तारीख जाहीर केली जाईल. करोना चाचणीत कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दोन्ही खेळाडूंना क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा पुढील सामना ८ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे, मात्र, हा सामना स्थगित होऊ शकतो, असे सांगितले जात होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

BCCI लवकरच केकेआर-आरसीबी सामन्याच्या तारखेचा निर्णय घेईल

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अन्य सामने पुढे ढकलले जाणार नसल्याचे सांगितले आहे. एका वरिष्ठ पत्रकाराने ट्विटरवर याचा खुलासा केला. बीसीसीआयने केकेआर आणि आरसीबी यांच्यातील हा सामना केव्हा आणि कोठे आयोजित होईल याबद्दल अधिकृत निवेदन दिलेले नाही. या दोन्ही संघांमधील सामना अहमदाबाद येथे खेळण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

IPL कोलकाता नाईट रायडर्स सध्या गुणतालिकेत ७ सामन्यांत २ विजयांसह सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर सध्याच्या मोसमात विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मजबूत स्थितीत आहे. आरसीबीने ७ पैकी ५ सामने जिंकले असून ते गुणतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर आहे.