वर्धा – निष्पाप तरुणीला जिवंत जाळण्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यात घडली असल्याने, जळीतकांडमधील पीडित तरुणीला वेळेत न्याय मिळावा तसेच आरोपीला तातडीने कठोर शिक्षा व्हावी याकरिता शिवाजी महाराज चौक येथून दिनांक 6 फेब्रुवारी रोजी शांततापुर्ण वातावरणात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वर्धा बंदला व्यवसायिकांनी प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवण्यात आले.या मोर्चांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिलांचा सहभाग होता.
दिनांक 3 फेब्रुवारी रोजी प्राध्यापिका तरुणीला हिंगणघाट शहरातील नंदोरी चौरस्त्याजवळ आरोपीने पेट्रोल टाकून पेटविले.ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडली. या पीडित तरुणीला न्याय मिळावा तसेच आरोपीला कठोरपणे शिक्षा व्हावी याकरिता वर्धेतील शिवाजी महाराज चौक येथून दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास हजारोंच्या संख्येने सामाजिक संघटनेच्या महिला, पुरुष, युवक व युवतीची मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शांततेपुर्ण वातावरणात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या भव्य मोर्चा मध्ये सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थिनी, गृहिणी, व्यापारी वर्ग, खासगी कर्मचारी उपस्थित होते.
आरोपी बाहेर आल्यास जिवंत जाळू
पीडित तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांनी या जनआक्रोश मोर्चात सहभाग घेतला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सदस्यांनी प्रसार माध्यमांसामोर आरोपी हा बाहेर आल्यास जिवंत जाळू असा अट्टाहास करण्यात आला.
पाच मुलींनी वेधून घेतले मोर्चाचे लक्ष
हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या मोर्चामध्ये पीडित तरुणीला पेटविणाऱ्या आरोपीला ‘फाशी द्या फाशी द्या’ असा आवाज ऐकू येत होता. या पाच मुलींनी या मोर्चाचे नेतृत्व हाती घेत शांततेपुर्ण वातावरणात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त
शिवाजी महाराज चौक येथून काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चा हा शांततेपुर्ण वातावरणात यशस्वी होण्यासाठी दंगल पथक,पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.