नागपुरात दुहेरी हत्याकांड, मामा-भाचीची हत्या

Crime in Nagpur नागपूर

नागपूर : सक्करदारमधील दत्तात्रय नगरात दुहेरी हत्याकांड घडले आहे. मामा-भाचीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्या झालेली महिला ही शिक्षिका आहे. मामा अशोक काटे यांची गळा घोटून तर मंजुषा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भाची मुख्याध्यापिका मंजुषा जयंतराव नाटेकर (५५) यांच्याकडे मामा अशोक काटे (७०) हे जवाहर नगर येथे काही दिवसांसाठी राहायला आले होते. दरम्यान, मंजुषा यांचे पती जयंतराव नाटेकर हे दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. तसेच मंजुषा यांच्या घराला बाहेरुन कुलप होते. त्या शनिवारी शाळेत गेल्या होत्या. रविवारी सुट्टी असल्याने घरीच होत्या. त्यानंतर सोमवारी शेजारच्यांना त्या शेवटच्या दिसल्या. मात्र त्यानंतर त्या दिसल्या नाहीत, अशी पोलिसांना माहिती मिळाली.

दरम्यान, त्यानंतर मामा अशोक काटे यांची गळा घोटून तर मंजुषा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यामागे घातपात आहे की अन्य काही, याचा तपास पोलीस करीत आहेत.