नागपूर : भारतीय संविधान ‘आम्ही भारताच्या लोकांनी’ दि. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पित केले. संविधानाची मूलभूत तत्वे, प्रत्येक नागरिकास संस्कारित करणारी आहे. संविधानातील मूलभूत गोष्टी या माणसाच्या प्रतिष्ठापूर्वक जगण्याची व विकसित अस्तित्त्ववाशी अत्यंत निगळीत आहे. भारतीय संविधान हे एकात्मता व बंधुतेचे तथा देशाच्या संपन्नतेचे जगातील सुंदर असे राष्ट्रग्रंथ आहे. संविधानाचे विचार ‘मना -मनात’ रुजविणे व ‘घरा-घरात’ पोहचवणे काळाची नितांत गरज आहे.
सण २००५ मध्ये माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे, नागपूर जिल्हा परिषदाला मुख्य अधिकारी असताना, संविधानाची ओळख शालेय जीवनापासूनच मुला-मुलींना व्हावी म्हणून त्यांनी सुरु केलेला. ‘प्रत्येक शाळांमधून दररोज भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन उपक्रम’ पुढे राज्यभर विस्तारित झाला. महाराष्ट्र शासनाचे ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस घोषित करून संविधानाच्या जाणीव-जागृतीसाठी कृती कार्यक्रम निर्दीशीत केला. सन २०१६ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ जयंती वर्षे ‘संत व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात आले. केंद्र शासनाने ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
संविधान दिनाच्या निमित्याने दि २६ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ७.०० वाजता नागपूर शहरात दीक्षाभूमी ते संविधान चौक ‘वॉक फॉर संविधान’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शहरातील नागरिकांनी संविधान्याच्या सन्मानासाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांना आदरांजली अर्पण करावी,असे आवाहन डॉ, बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनच्या वतीने प्रा. महेंद्रकुमार मेश्राम व संजीवनी संखी मंचच्या वतीने कल्पना मेश्राम यांनी केले आहे.
अधिक वाचा : आदिवासी गोवारी स्मारकास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महापौर, उपमहापौरांनी केले अभिवादन