आदिवासी गोवारी स्मारकास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महापौर, उपमहापौरांनी केले अभिवादन

नागपूर

नागपूर : शासनदरबारी आपल्या मागण्या मांडण्यासाठी आलेल्या गोवारी बांधवांसोबत झालेल्या दुर्घटनेमध्ये शहिद झालेल्या ११४ गोवारी बांधवांना शुक्रवारी (ता. २३) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, डॉ. मिलींद माने यांनी अभिवादन केले. यावेळी मान्यवरांनी झिरो माईल येथील शहिद आदिवासी गोवारी स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

२३ नोव्हेंबर १९९४ रोजी आपल्या न्याय मागण्यांसाठी हजारो गोवारी बांधवांनी भव्य मोर्चा काढला होता. मात्र यावेळी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली व घटनेमध्ये ११४ आदिवासी गोवारी बांधव शहिद झाले. समाजाच्या मागण्यांसाठी जीव अर्पण करणाऱ्या सर्व शहिद बांधवांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून यावेळी मान्यवरांनी अभिवादन केले.

यावेळी कर संकलन समिती सभापती संदीप जाधव, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, माजी महापौर अर्चना डेहनकर, नगरसेवक सुनील हिरणवार, भोजराज डूंबे, चंदन गोसावी, रमेश वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा : रोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू : नितीन गडकरी