महर्षी सुदर्शन महाराज जयंती निमित्त महापौर, उपमहापौरांनी केले अभिवादन

नागपूर

नागपूर : महर्षी सुदर्शन महाराज यांच्या जयंती निमित्त शुक्रवारी (ता. २३) मनपा मुख्यालयातील दालनात आयोजित कार्यक्रमात महर्षी सुदर्शन महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी महर्षी सुदर्शन महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी नगरसेवक विजय चुटेले, नगरसेविका लिला हाथीबेड, दिलीप हाथीबेड, राजेश हाथीबेड, अजय हाथीबेड, मोती जनवारे, किशोर समुद्रे, विक्की बढेल, अविनाश डेलीकर, कमलेश मोरकर, दिपक कस्तुरे, प्रशांत तोमसकर यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.

अधिक वाचा : रोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू : नितीन गडकरी