नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवनेनेत जाणार या वृत्ताचा खुद्द भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. आपण शिवबंधन बांधून घेणार नसून आपल्या मनगटावर घड्याळच राहील असे सांगत शिवसेना प्रवेशाची चर्चा ही निव्वळ अफवा असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
आज ११ वाजता गुजरातसह समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणाऱ्या राज्यातील पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील देवसाने येथे माझ्याच हस्ते होत आहे. आपण या कार्यक्रमात गुंतलेलो असून माझ्या शिवसेना प्रवेशाबाबतच्या चर्चेच काहीएक तथ्य नाही असे भुजबळ प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार याबाबतचे वृत्तही आपण टीव्हीवरच पाहिले. माझे आणि सचिन अहिर यांचे बोलणे झालेले नाही. सचिन अहिर आणि माझा मुळचा मतदारसंघ एकच आहे. यामुळेच कदाचित सचिन अहिर यांच्याबरोबर माझे नाव घेतले जात असावे, असेही भुजबळ म्हणाले.
अधिक वाचा : सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती