मान्सून अखेर कोकणात दाखल; लवकरच राज्यभर बरसणार

नागपूर : मुंबई- ज्याची राज्यातील सर्वांनाच प्रतिक्षा होती, तो मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे. या वर्षी महाराष्ट्रात काहीशा उशिराने दाखल झाला आहे. हवामान खात्याने कोकणात मान्सून दाखल असल्याची माहिती जाहीर केली. आगामी काही दिवसात राज्यातही मान्सून हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे.

मागील आठवड्यात आलेल्या वायू वादळामुळे मान्सूवर परिणाम होणार असल्याची शक्यता त्यावेळी वर्तवण्यात येत होती. शिवाय, वायू वादळानंतर झालेल्या बदलामुळे मान्सून दाखल होण्यास उशीर लागणार असल्याचे वृत्त होते. आज हवामान खात्याने मान्सून कोकणातील आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील भागात दाखल असल्याचे जाहीर केले. आगामी दोन-तीन दिवसात राज्यातील काही भागातील हवामान पावसाची अनुकूल असणार असल्याचा अंदाज आहे.

अधिक वाचा : महाराजबाग चिड़ियाघर के मास्टर प्लान में करने होंगे कई सुधार, सीजेड के विशेषज्ञों ने प्लान की बारीकी से जांच के बाद सुझाए जरूरी बदलाव