शिक्षक दिन विशेष; आज शिक्षकांना म्हणा ‘थँक्यू टीचर’

शिक्षक

नागपूर : प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत गुरू (शिक्षक) हा महत्वाचा दुवा असतो. या शिक्षकचा दरवर्षी शासनातर्फे सत्कार करण्यात येतो. पण यंदा कोरोनामुळे शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन शक्य नसल्याने, शासनाने यंदा समाजातील प्रत्येकाला शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ५ सप्टेबर रोजी ‘शिक्षक दिनाला’ ‘थँक्यू टिचर’ म्हणण्याचे आवाहन केले आहे.

भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी शिक्षक दिनाला शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा राज्यपालांच्याहस्ते गौरव करण्यात येतो. कोरनामुळे यावर्षी शिक्षक दिन नेहमीप्रमाण साजरा करणे शक्य नाही. शासनातर्फे यंदा शिक्षकांचा गौरव करणे शक्य नसल्यामुळे शासनाने शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी ‘थँक्स टीचर’ हे अभियान राबविले आहे. यासाठी शासनाने सोशल मीडियाचा वापर केला आहे. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदीवर ही मोहिम राबविण्यात येत असून, यामध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हे अभियान ५ ते १० सप्टेेंबरपर्यंत राबवायचे आहे. या उपक्रमाचे शाळानिहाय आयोजन करून शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून एकत्रित करून अहवाल सादर करायचा आहे.

कृती कार्यक्रमाचेही आयोजन
१) शाळा बंद शिक्षण सुरू उपक्रम यशोगाथेचे सादरीकरण केंद्रस्तर, तालुकास्तर जिल्हास्तरावरून करण्यात यावे.

२) कोरना कोळात शाळा बंद असल्या तरी वाडी, वस्त्या, तांडे, दुर्गम व शहरी भागातील शिक्षकांसोबत काही स्वयंसेवक, शिक्षक मित्र शिक्षण देण्याचे स्वयंस्फुर्तीने काम करीत आहे. अशा व्यक्तींचा वेबीनार आयोजित करून त्यात शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचा समावेश करावा.
३) शिक्षक दिनाच्या अनुषंगाने वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य, पोस्टर, कविता, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन आदी विषयावर ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन.

४) कोविड योद्धा शिक्षकांचे अनुभव कथन व कौतुक करण्यात यावे.