सुषमा स्वराज यांचा जीवनप्रवास प्रवास : वकील ते केंद्रीय मंत्री

Date:

नागपूर: आपल्या अभ्यासू आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासियांच्या मनावर गारूड निर्माण करणाऱ्या कणखर नेत्या, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री आणि उत्कृष्ट संसदपटू सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. महिलांच्या आयडॉल असणाऱ्या स्वराज यांचा विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्या, सर्वोच्च न्यायालयातील वकील ते केंद्रीय मंत्री हा प्रवास नुसताच संघर्षमय नसून थक्क करणारा असा आहे. स्वराज यांनी आपल्या चार दशकाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मान-सन्मान पटकावतानाच अनेक विक्रमही नोंदविले आहेत.

हरयाणाच्या अंबाला छावणीमध्ये १४ जानेवारी १९५२मध्ये जन्मलेल्या स्वराज यांना त्यांच्या आजी-आजोबांनी दत्तक घेतलं होतं. त्यांनी चंदीगडमधून लॉची पदवी घेतली होती. कॉलेजमध्ये असतानाच त्यांची भेट स्वराज कौशल यांच्याशी झाली. १३ जुलै १९७५ मध्ये त्यांनी स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला. या दोघांनी सोबतच सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिसही सुरू केली होती.

राजकीय प्रवास

७०च्या दशकात स्वराज या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत दाखल झाल्या. त्यांचे पती स्वराज कौशल हे समाजवादी नेते होते. ते जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे १९७५मध्ये स्वराज या सुद्धा फर्नांडिस यांच्या आंदोलनाशी जोडल्या गेल्या. आणीबाणीच्या काळात त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात सहभाग घेतला होता. आणीबाणी नंतर त्या जनता पार्टीत सहभागी झाल्या. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिलीही केली होती. २००९मध्ये त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम पाहिलं.

स्वराज यांचा परिचय

>> १४ जानेवारी १९५२ रोजी हरयाणाच्या अंबाला छावणीमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते.

>> त्यांनी अंबाला येथे सनातन धर्म कॉलेजमधून संस्कृत तसेच राज्यशास्त्रात पदवी घेतली

>> एस. डी. कॉलेजमध्ये त्यांची उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून निवड झाली होती

>> सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वकिलीची प्रॅक्टिसही केली होती

>> त्याचे पती स्वराज कौशल हे राज्यसभेचे सदस्य होते, त्याशिवाय मिझोरामचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते

>> त्यांची मुलगी बांसुरी लंडनच्या इनर टेम्पलमध्ये वकिली करत आहे

>> १९७७मध्ये त्या हरयाणाच्या अंबाला छावणी विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा निवडून आल्या

>> १९७७ ते ७९ दरम्यान त्या चौधरी देवी लाल यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या

>> १९७९मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी त्या हरयाणा जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा बनल्या

>> मार्च १९९८मध्ये त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या

>> त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि १२ ऑक्टोबर १९९८मध्ये त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या

>> २०००-२००३ मध्ये त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिलं

>> २००३-२००४मध्ये त्यांनी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री म्हणून काम पाहिलं

>> २००९-२०१४मध्ये त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून काम पाहिलं

>> २०१४मध्ये त्यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं

स्वराज यांची विक्रमी कारकिर्द

>> एखाद्या राज्याची सर्वात कमी वयात कॅबिनेट मंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला

>> त्या वयाच्या २५ व्या वर्षीच हरयाणाच्या कॅबिनेट मंत्री बनल्या

>> त्या भाजपच्या पहिल्या महिला प्रवक्ता होत्या

>> भाजपच्या त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या

>> त्या भाजपच्या पहिल्या महिला सरचिटणीस होत्या

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

New Announcement by Meta: Changing WhatsApp Business Pricing

Meta has officially announced significant updates to WhatsApp Business...

Pioneering Global Excellence: DMIHER’S Maiden Performance in Times Higher Education (THE) World University Rankings 2025

"DMIHER Achieves Global Milestone: Debut Performance in Times Higher...

Building on Decades of Cooperation: Länd Here Campaign Invites Skilled Workers From Maharashtra to Germany’s Baden-württemberg

Decades of Partnership: Länd Here Campaign Welcomes Skilled Workers...