नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातून फडणवीस सरकारला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्ट आता मंगळवारी सकाळी १०.३० वाजता निर्णय देणार आहे. सोमवारी कोर्टात जवळपास २ तास यावर दोन्ही पक्षाच्या वकिलांनी बाजू मांडली. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून २४ तासात बहुमतचाचणी घेण्याची मागणी करण्यात आली होती.
मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलं की, ‘राज्यपालांनी फ्लोर टेस्टसाठी १४ दिवसाची वेळ दिली होती. त्यांनी म्हटलं की, प्रोटेम स्पीकरनंतर स्पीकरची निवड महत्त्वाची आहे. पण विरोधी पक्ष प्रोटेम स्पीकरकडूनच फ्लोर टेस्टसाठी आग्रही आहे. पुढच्या सात दिवसात फ्लोर टेस्ट नाही होऊ शकत. मंगळवारी देखील फ्लोर टेस्टचा आदेश देऊ नये.’