नागपूर: २९ सप्टंबरपासून डोंगरगड येथे सुरू होत असलेल्या नवरात्री यात्रेनिमित्त काही रेल्वे गाड्यांना डोंगरगड रेल्वे स्थानकावर तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने घेतला आहे. डोंगरगड येथे माँ बमलेश्वरीचे प्रसिद्ध मंदिर आहे. दरवर्षी नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी ठिकठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. या यात्रेला येणाऱ्या प्रवाशांची सुविधा व्हावी म्हणून २९ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान पुढील गाड्यांना डोंगरगड येथे थांबा देण्यात आला आहे. कंसात संबंधित गाडीची आगमन व प्रस्थान वेळ दिली आहे.
१२८५१ बिलासपूर-चेन्नई एक्स्प्रेस (१२.१४, १२.१६), १२८५२ चेन्नई-बिलासपूर एक्स्प्रेस (१६.४४, १६.४६), १२८१२ हतिया-कुर्ला (हतिया एक्स्प्रेस) (२०.५७, २०.५९), १२८११ कुर्ला-हतिया एक्स्प्रेस (१६.४९, १६.५१), २०८१३ पुरी-जोधपूर एक्स्प्रेस (७.१२, ७.१४), २०८१४ जोधपूर-पुरी एक्स्प्रेस (१७.५०, १७.५२), १२९०६ हावडा-पोरबंदर एक्स्प्रेस (१३.०८, १३.१०), १२९०५ पोरबंदर-हावडा एक्स्प्रेस (१२.४३, १२.४५). पुढील गाड्यांचा २९ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या काळात डोंगरगडपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ५८२०२ जुनागड रोड-रायपूर पॅसेंजर, ५८२०४ रायपूर-गेवरा रोड पॅसेंजर, ६८७४१- ६८७४२ दुर्ग-गोंदिया-दुर्ग मेमू रायपूरपर्यंत विस्तार, ०८६८४- ०८६८३ डोंगरगड-इतवारी-डोंगरगड यात्रा विशेष पॅसेंजर, ६८७४१ दुर्ग-गोंदिया मेमू, ६८७४२ गोंदिया-दुर्ग मेमू या गाड्यांचा रायपूरपर्यंत विस्तार. याशिवाय या यात्रेनिमित्त रेल्वतर्फे प्रवाशी सहायता केंद्र, चौकशी केंद्र, अतिरिक्त प्रसाधनगृह, यांची व्यवस्था डोंगरगड स्थानकावर करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी स्काऊट-गाइडचे विद्यार्थी, वाणिज्य निरीक्षक स्थानकावर असल्याचे दपूमरेने कळविले आहे.