‘या’ बारा केंद्रीय मंत्र्यांना राजीनामे देण्याची ही आहेत कारणे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी जुन्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची लडच बुधवारी लागली. सायंकाळी शपथविधी सोहळा सुरू होण्यापूर्वीच 12 मंत्र्यांनी आपापले राजीनामे सादर केले होते. कायदामंत्री रविशंकर प्रसाद तसेच माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या एकदम ऐनवेळी म्हणजे सायंकाळी साडेपाचला सादर झालेल्या राजीनाम्यांची राजधानीत एकच चर्चा झाली.

मोदी सरकारमधील जावडेकर व प्रसाद या महत्त्वाच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यांमागे वयाचे कारण सांगितले जाते. यांच्याव्यतिरिक्त अन्य मंत्र्यांच्या राजीनाम्यांमागे कोरोना आणि बंगालच्या निवडणुकीचे निकाल असल्याचे मानले जाते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आरोग्य व्यवस्थेवर आलेल्या तणावाची अखेर डॉ. हर्षवर्धन यांची केंद्रीय आरोग्य मंत्रिपदावरून पायउतार होण्यात झाली. याच खात्याचे राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनाही त्याचाच फटका बसला. बंगाल निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीतूनच बाबुल सुप्रियो आणि देबोश्री चौधरी यांच्या राजीनाम्यांकडेही पाहिले जात आहे.

राजीनामा दिलेले मंत्री

1) रविशंकर प्रसाद,

2) प्रकाश जावडेकर,

3) थावरचंद गेहलोत,

4) रमेश पोखरियाल निशंक,

5) डॉ. हर्षवर्धन,

6) सदानंद गौडा,

7) संतोषकुमार गंगवार,

8) बाबुल सुप्रियो,

9) संजय धोत्रे,

10) रतनलाल कटारिया,

11) प्रतापचंद सारंगी,

12) देबोश्री चौधरी