Raj Kundra Porn Movie Case: मला ३० लाख देत होता, मी त्याचे २० प्रोजेक्ट केले

Date:

मुंबई : राज कुंद्रा पोर्न फिल्म : मुंबई पोलिसांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सॉफ्ट पोर्नोग्राफीसंबंधी चित्रपट बनवण्यासाठी व अपलोड करण्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

२६ मार्च रोजी मुंबई पोलिसांनीही याच प्रकरणात एकता कपूरचा जबाब घेतला होता.

महाराष्ट्र सायबर सेलने यापूर्वीच मॉडेल शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांची साक्ष नोंदवली आहे. राज कुंद्राविरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे.

राज कुंद्रा पोर्न फिल्म : शर्लिन चोप्राचा गंभीर आरोप

यावेळी शर्लिन म्हणाली की, ‘मला आणखी सांगायचे आहे की, राज कुंद्राविरोधात मी २०१९ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्याचबरोबर मुंबई हायकोर्टात त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि चोरीची तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी चौकशी सुरू आहे, म्हणून मी माझ्या वक्तव्यावर लगाम घालू इच्छिते. माझा पोलिस आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार राज कुंद्राविरूद्ध ठोस पुरावे आहेत.

एफआयआरनुसार या प्रकरणात राज कुंद्राचे नाव शर्लिन चोप्राने पोलिसांसमोर घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्लिन चोप्रा असे म्हणते की राज कुंद्रानेच तिला पोर्न इंडस्ट्रीत आणले.

शर्लिन चोप्राला प्रत्येक प्रकल्पासाठी 30 लाख रुपयांचे पैसे दिले जायचे. शर्लिनच्या म्हणण्यानुसार तिने असे १५ ते २० प्रकल्प केले आहेत.

हा गोरख धंदा कसा करत होता?

मुंबई पोलिस आयुक्तांनी निवेदन जारी करत म्हटले आहे की तपासणी दरम्यान असे आढळले की राज कुंद्रा या रॅकेटचा मुख्य आरोपी आहे. त्याच्याविरूद्ध पोलिसांना पुष्कळ ठोस पुरावे मिळाले आहेत, त्यानंतरच त्याला सोमवारी अटक करण्यात आली.

पोलिसांचा असा दावा आहे की राज कुंद्रा यांनी आपल्या एका नातेवाईकासह ब्रिटन आधारित कंपनी स्थापन केली आणि ही कंपनी अनेक एजंट्सना पोर्न फिल्मसाठी कॉन्ट्रॅक्ट देते.

पूनम पांडेकडून आरोप

गेल्या वर्षी मॉडेल पूनम पांडेने राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी सौरभ कुशवाह विरोधात खटला दाखल केला होता.

तिने सांगितले की, राजच्या कंपनीने त्यांचे फोटो बेकायदेशीरपणे वापरले आहेत. त्यादरम्यानचा करार आधीच संपला होता.

दुसरीकडे राज कुंद्राने हे आरोप सरसकट फेटाळले होते.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related