स्मार्टफोन हरवला? PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस

Date:

नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा झाला आहे. फोनमध्ये केवळ कॉन्टॅक्ट नंबर, गाणी, फोटो इतकंच नसतं, तर अनेक सोशल मीडिया अकाउंट्स (Social Media Accounts), बँक अकाउंट्स (Bank Account), ऑनलाईन पेमेंट अकाउंट्स सेव्ह (Online Payment Apps) असतात. अशात कधी मोबाईल हरवला तर मोठी समस्या निर्माण होते. फोन हरवल्यास सेव्ह असलेल्या बँक अकाउंट्स, पेमेंट अ‍ॅप्सचा चुकीचा वापर होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे फोन हरवल्यानंतर लगेचच हे पेमेंट अ‍ॅप्स ब्लॉक (Online Payment Apps Block) करणं सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो.

Paytm –

– पेटीएम पेमेंट बँकेच्या हेल्पलाईन नंबर 01204456456 वर कॉल करा.

– Lost Phone हा पर्याय निवडा.

– दुसरा नवा नंबर लिहिण्याच्या पर्यायात जा आणि तुमचा हरवलेला फोन नंबर लिहा.

– सर्व डिव्हाईसमधून Logout करण्याचा पर्याय निवडा.

– त्यानंतर पेटीएम वेबसाईटवर जा आणि 24*7 हेल्पची निवड करण्यासाठी खाली स्क्रॉल करा.

– रिपोर्ट फ्रॉड पर्यायात जा आणि कोणत्याही कॅटेगरीवर क्लिक करा.

– त्यानंतर कोणत्याही इश्यूवर क्लिक करा आणि सर्वात खाली असलेल्या Message Us बटणावर क्लिक करा.

– तुम्हीच या अकाउंटचे खरे युजर आहात हे सांगण्यासाठी एक सर्टिफिकेट जमा करावं लागेल. जे डेबिट-क्रेडिट कार्ड डिटेल्स असू शकतात. ज्यात पेटीएम खात्यातील व्यवहार, व्यवहारासाठी एक कन्फर्मेशन ईमेल किंवा SMS, हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या फोनची पोलीस स्टेशनमधील FIR अशा कोणत्याही गोष्टी सर्टिफिकेट म्हणून असू शकतात. या प्रोसेसनंतर पेटीएम तुमचं खातं ब्लॉक करेल आणि त्यानंतर कन्फर्मेशन मेसेज येईल.

Google Pay –

– गुगल पे युजर्स 18004190157 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतात. हवी ती भाषा निवडा.

– जाणाकाराची बोलण्यासाठी हेल्पलाईनवर तो पर्याय निवडा, जो गुगल पे अकाउंट ब्लॉक करण्यासाठी मदत करेल.

Phone Pay –

– फोन पे युजर्स 08068727374 किंवा 02268727374 या क्रमांकावर कॉल करू शकतात.

– इथे हवी ती भाषा निवडल्यानंतर, फोन पे अकाउंटमध्ये कोणती समस्या रिपोर्ट करायची आहे ते विचारलं जाईल.

– आता रजिस्टर्ड नंबर टाका, कन्फर्मेशनसाठी OTP पाठवला जाईल.

– ओटीपी मिळाला नसल्याच्या पर्यायावर क्लिक करा.

– इथे सिम किंवा फोन हरवला असल्याचा पर्याय दिसेल, त्यावर रिपोर्ट करा.

– आता कस्टमर केअरशी जोडलं जाता येईल. फोन नंबर, ईमेल, लास्ट ट्रान्झेक्शन, लास्ट ट्रान्झेक्शन रक्कम असे डिटेल्स विचारले जातील. त्यानंतर तुमचं अकाउंट ब्लॉक करण्यासाठी मदत केली जाईल.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...