LPG Gas Cyliner: गॅस सिलेंडर बुकिंगवर 900 रुपयांची सूट, पाहा कसा घेता येईल या ऑफरचा फायदा

LPG
LPG Cylinder Cost Drops down via Rs 91.50 | Our Nagpur

नवी दिल्ली, 22 जुलै : जर तुम्ही गॅस सिलेंडर बुक (LPG Gas cylinder) करत असाल, तर तुम्हाला 900 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. IOCL ने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. पेटीएमकडून (Paytm) ग्राहकांना ही खास ऑफर दिली जात आहे. पेटीएमची ही खास ऑफर (Paytm offer) 31 जुलैपर्यंत वॅलिड आहे. युजर्स 3 LPG Cylinder बुक करण्यापर्यंत 900 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकतात.

पेटीएमवरुन सुरुवातीच्या 3 सिलेंडरवर ही 900 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. या ऑफरचा फायदा केवळ अशा ग्राहकांना मिळेल, जे पहिल्यांदा पेटीएमवरुन गॅस सिलेंडर बुकिंग करत आहेत. ही ऑफर कमीत कमी 500 रुपयांच्या बुकिंगवर मिळेल. या कँपेनमध्ये युजर्स केवळ एकदाच ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

IOCL ने केलं ट्विट –

IOCL ने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. पेटीएमवर पेमेंट करुन सिलेंडर रिफील केल्यास, 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. याबाबत अधिक माहिती https://paytm.com/cylinder-gas-recharge/indane अधिकृत लिंकवर घेता येईल.

कसं कराल बुकिंग –

– सर्वात आधी Paytm App वर Show more वर क्लिक करा.

– Recharge आणि Pay Bill वर Click करा.

– Book a cylinder वर क्लिक करा.

– आपला गॅस प्रोव्हाईडर निवडा.

– आता मोबाईल नंबर किंवा LPG Id भरा.

– त्यानंतर पेमेंट करावं लागेल.

– त्यानंतर स्क्रॅच कार्ड येईल. या स्क्रॅच कार्डचा 7 दिवसांमध्ये वापर करावा लागेल.