MH CET अकरावी प्रवेश परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची वेबसाईट केली बंद; ‘हे’ कारण आलं समोर

Date:

मुंबई : कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exams) राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल (10th Result) लागल्यानंतर अकरावीच्या (11th Admissions) प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा 21 ऑगस्टला होणार आहे. या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु करण्यात आली होती. मात्र आता रजिस्ट्रेशनची वेबसाईट राज्य शिक्षण मंडळाकडून बंद (CET Registration website closed) करण्यात आली आहे.

http://cet.mh-ssc.ac.in/ ही महाराष्ट्र CET 2021 ची अधिकृत वेबसाइट महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून CET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठी जारी करण्यात आली होती. त्यानुसार कालपासून म्हणजेच 20 जुलैपासून रजिस्ट्रेशन प्रोसेस (Registration process stopped) झाली होती. रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 26 जुलै संगणयत आली होती. मात्र आता हे वेबसाईट बंद करण्यात आली आहे.

काही तांत्रिक कारणास्तव ही वेबसाईट बंद करण्यात येत आहे असं राज्य शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. रजिस्ट्रेशन सुरु झाल्यानंतर काही वेळ ही वेबसाईट सुरु होत होती. मात्र काही विद्यार्थ्यांना आज सकाळपासूनच वेबसाईट ओपन करण्यास अडचणी येत होत्या. मात्र आता शिक्षण मंडळानं अधिकृत पत्रक जारी करत ही वेबसाईट काही काळासाठी बंद केली आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार पुरेसा वेळ

राज्य शिक्षण मंडळाकडून जरी ही वेबसाईट बंद करण्यात आली असली तरी तांत्रिक अडचण (Technical Error) दूर केल्यानंतर ही वेबसाईट पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी पुरेसा वेळ देण्यात येईल असंही या पत्रकात सांगण्यात आलंय त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Dalmia Cement: Now The RCF Expert! Welcoming Ranveer Singh As Brand Ambassador!

To extend its legacy of technical excellence to home...

Yellow Fever Vaccination in Maharashtra

Yellow Fever Vaccination Maharashtra Yellow Fever Vaccination Maharashtra, if you're...

Dominate the Digital Space: Unveiling the Top Facebook Ads Agency in India

Are you a business owner in India looking to...