Pune Fire: DNA घेऊन पटवणार मृतांची ओळख, मृत्यू झालेल्या 17 जणांची नावं आली समोर

Date:

Pune Fire: पुण्यात केमिकल बनवणाऱ्या कंपनीला लागलेली आग इतकी भयंकर होती की यामध्ये मृतांची ओळख पटवणंही कठीण होत आहे. त्यामुळे डीएनए टेस्ट करून मृतांच्या नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द केले जात आहेत.

पुणे, 08 जून: पुण्यामध्ये सोमवारी लागलेल्या भीषण आगीमध्ये 18 निष्पापांचा बळी गेला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये असणाऱ्या उरवडे याठिकाणी SVS Aqua Technologies कंपनीला लागलेल्या आगीत (Pune Mulashi Fire) 15 महिलांसह एकूण 18 जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान या कंपनीमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणली असली तरी काही ठिकाणी अद्यापही काही भागात आग धुमसत आहे. ही आग इतकी भीषण होती की या आगीत ज्या 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला त्यांच्या मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण होत आहे. त्यामुळे DNA टेस्ट करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. दरम्यान या आगीमध्ये सापडल्याने मृत्यू झालेल्या 17 जणांची नावं समोर आली आहेत, कंपनीकडून ही नाव देण्यात आली आहेत. अद्याप अठरावं नाव समोर आलेलं नाही.

मृतांची नावं- अर्चना कवाळे, सचिन घोडके, संगीता गोंदे, मंगल मरगळे, सुरेखा तुपे, सुमन फेबे, सुनीता साठे, संगीता पोळेकर, माधुरी आंबरे, मंदा कुलाट, त्रिशला जाधव, अतुल साठे, सीमा बोराडे, गीता दिवाडकर, शीतल खोपाकर, सारीका कुडले, धनश्री शेलार. ही त्या 17 मृतांची नावं असून अद्याप एका व्यक्तीचं नाव समजलेलं नाही. त्याबाबत माहिती मिळवली जात आहे.

पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली होती. याठिकाणी कंपनीत ज्वालाग्रही पदार्थ असल्यामुळे काही ठिकाणीही अद्यापही आग धुमसत आहे. कंपनीची इमारत आगीत जळून भस्मसात झाली असून घटनेच्या दुसऱ्या दिवशीही काही भागात आग धुमसत आहे. या कंपनीमध्ये जवळपास 37 मजूर काम करत होते. त्यापैकी 18 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत. इतर 19 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यापैकी काही जखमींवर उपचार सुरू आहेत. तर धुमसणारी आग विझवण्यासाठीही एक अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुखही घटनास्थळी पोहोचले आहेत.

कंपनीतील पॅकिंग विभागात ही आग लागली होती, बंदिस्त खोलीत आग लागल्यामुळे कुणालाही बाहेर पडता आलं नाही. याठिकाणी आर एम वन पावडर ही ज्वालाग्राही पदार्थ असल्याने, त्यावर दाब पडून आग लागल्याचा अंदाज आहे. मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के याप्रकरणाची चौकशी करणार आहेत. शिवाय मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार, केंद्र सरकार तर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. सध्या हे मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले असून डीएनएच्या साहाय्याने ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

दरम्यान मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी पोचणार आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणी नऊ जणांची समिती आज चौकशी करणार असून आगीचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आजच रिपोर्ट सोपवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Top 10 Email Migration Software for Gmail in 2024

Email migration can be a daunting task, especially when...

Top Best Bulk SMS Service Providers in India

Below is the list of companies currently providing top...

Top Digital Marketing Innovators to Watch in 2025

As an online business in the digital world, where...

ICSI Workshop in Nagpur : “Decoding Companies Act” for Compliance and Governance

Nagpur : Nagpur Chapter of ICSI organized a Workshop...