मुंबई : काँग्रेस पक्षातील सर्व पदे आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रियांका चतुर्वेदी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियांका यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
‘मुंबई ही माझी जन्मभूमी, कर्मभूमी आहे. पण गेल्या काही वर्षांत मुंबईपासून तुटल्यासारखं वाटत होतं. मला पुन्हा येथे काम करायला मिळणार आहे, याचा खूप आनंद होत आहे,’ अशा शब्दांत प्रियांका यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. काँग्रेस पक्षात अखेरच्या काही दिवसांत होत असलेल्या घुसमटीबद्दलही त्यांनी सांगितले. ‘महिलांंसाठी काम करायला आवडेल. शिवसेनेच्या राज्यातच नव्हे तर देशातील प्रसारासाठी काम करणार,’ असं त्या म्हणाल्या. ‘प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शिवसेनेची निवड केली याचा आम्हाला आनंद आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘मुंबईत युथ काँग्रेसची सदस्य म्हणून मी दहा वर्षांपूर्वी कामाला सुरुवात केली. पक्षाने मला विविध व्यासपीठांवर शिकण्याची, प्रगतीची संधी दिली. पण गेल्या काही आठवड्यापासून अशा काही घटना घडल्या की माझ्या सेवेची पक्षाला किंमत नसल्याची जाणीव मला होत गेली,’ असं चतुर्वेदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
अधिक वाचा : Election 2019: “Unlike Fake Narendra Modi”: Mayawati Roots For Old Rival Mulayam Singh