मोदींच्या 3 हायलेव्हल मीटिंग आज: ज्या राज्यांमध्ये कोरोना प्रकरण सर्वात जास्त,त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी होणार चर्चा; ऑक्सिजन कंपन्यांच्या मालकासोबतही करणार चर्चा

Date:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान तीन उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. मोदी प्रथम इंटरनल बैठक घेतील. यानंतर ते ज्या राज्यांमध्ये कोरोना प्रकरण सर्वात जास्त समोर येत आहेत अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतील. ऑक्सिजन तयार करणार्‍या कंपनी मालकांसह पंतप्रधानांची तिसरी बैठक होणार आहे. त्यांनी आपला बंगाल दौराही रद्द केला आहे. यापूर्वी ते मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि दक्षिण कोलकाता येथे सभेला संबोधित करणार होते. पण आता ते चारही सभा व्हर्चुअली करतील. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी सभेसाठी पूर्ण तयारी केली होती, परंतु शेवटच्या क्षणी सभा रद्द करण्यात आल्या.

पंतप्रधानांची इंटरनल बैठक सकाळी 9 वाजता होईल. यात कोण सामील होईल याची माहिती नाही. दुसरी बैठक सकाळी दहा वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत होईल. यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, राजस्थान, बिहार आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. यानंतर दुपारी 12.30 वाजता मोदी ऑक्सिजन उत्पादन कंपन्यांच्या मालकांशी चर्चा करतील.

या सभांमुळे नरेंद्र मोदींनी शुक्रवारी आपला बंगाल दौरा रद्द केला आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. येथील 4 जिल्ह्यांमधील 56 विधानसभा जागांसाठी त्यांना 4 सभा घ्यायच्या होत्या. मात्र, संध्याकाळी 5 वाजता ते राज्यातील मतदारांना व्हर्चुअली आवाहन करतील.

देशातील 6 उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातही ऑक्सिजनच्या विषयावर सुनावणी होत आहे. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठा करणारी वाहने न थांबवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. त्याआधी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ऑक्सिजन पुरवठ्याबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिली की राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात कोणताही अडथळा येऊ नये.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related