बहिणीला शिवीगाळ केल्याने एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

Nagpur Crime: हत्या करून बालगुन्हेगाराच्या शरीराचे तुकडे

पुणे: मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार जनवाडीत घडला. या प्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलाने फिर्याद दिली आहे. त्यावरून अजय बेल्लम (वय २५, रा. जनवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादीच्या ओळखीचा आहे. फिर्यादी बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जनवाडीतील त्रिमूर्ती मित्रमंडळासमोर घराबाहेर उभा होता. त्या वेळी आरोपी तेथे आला. ‘तू राकेश शेजवळच्या बहिणीस काल शिवीगाळ का केली,’ अशी विचारणा करून आरोपीने फिर्यादीच्या डाव्या कानावर आणि उजव्या हातावर कोयत्याने वार केला. त्या वेळी फिर्यादीच्या बहिणीने आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिलाही शिवीगाळ केली.

फोनवर अश्लील बोलून विनयभंग                                                                                              ‘मला तुला प्रपोज करायचे आहे. मला तू खूप आ‌वडतेस,’ असे फोनवर सांगून एका अनोळखी व्यक्तीने संबंधित महिलेला सातत्याने व्हॉट्स अॅपवर व्हिडिओ कॉलकरून विनयभंग केल्याचा प्रकार लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या प्रकरणी एका ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून एका २७ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.