गोंदियात घबराट; पॅराशूट सदृश्य फुगा घरावर पडला

Date:

गोंदिया: गोरेगाव तालुक्यातील चीचगाव येथे एका घरावर पॅराशूट सदृश्य मोठ्या आकाराचा फुगा पडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेची बातमी सर्वत्र पसरताच आकाशातून पडलेला हा फुगा पाहण्यासाठी नागरिकांनी या घरासमोर एकच झुंबड केली होती.

आज सकाळी ७ वाजता ही घटना घडली. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांच्या घरासमोरील दखणे यांच्या घरावर हा फुगा पडला. घरावर काही तरी पडल्याने मोठा आवाज झाल्याने घरावर काय पडले हे पाहण्यासाठी घरातील लोक बाहेर आले. त्यावेळी त्यांना घरावर मोठा फुगा दिसला. दखणे कुटुंबांनी ही माहिती परिसरातील ग्रामस्थांना दिली. त्यामुळे ही बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली आणि दखणे यांच्या घरासमोर एकच झुंबड उडाली. त्यानंतर काही ग्रामस्थांनी पुढे होऊन हे साहित्य तपासले असता त्यात दोन किट आढळून आल्या. त्यावर ‘मौसम विभाग के महानिदेशक का कार्यालय, भारत मौसम विज्ञान विभाग, लोधी रोड नवी दिल्ली ‘असे लिहिले आहे. यावरून सदर पॅराशूट सदृश फुगा हा भारतीय हवामान खात्याचे माहिती दर्शक उपक्रमाचे साधन असावे, असे स्पष्ट होते. विशेष म्हणजे घरावर पडल्यानंतरही त्या दोन किट्समध्ये लाइट जळत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related