नागपुरात तीन दिवस पाणी बंद ; बुधवार, शुक्रवार व रविवार या तीन दिवशी शहरात पाणीच येणार नाही

Date:

नागपूर : वाढलेला उन्हाळा व त्यातच पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या जलसंकटावर मात करण्यासाठी मनपाने नागपूर शहरात तीन दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. बुधवार, शुक्रवार व रविवार या तीन दिवशी शहरात पाणीच येणार नाही. टँकरनेही पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्याचे योग्य नियोजन व साठवणूक करण्याशिवाय आता पर्याय नाही. जुलै महिना अर्धा संपला तरीही पाऊस नाही. जलाशय, विहिरींनी तळ गाठला. पाणीसाठाही संपत आला आहे. या समस्येसह मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे भर पावसाळ्यात शहरावर ‘जलसंकट कोसळल्याने, इतिहासात पहिल्यांदाच मनपावर पाणीकपातीची नामुष्की ओढवली आहे. एक आठवड्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरीही पाऊस लांबल्यास पाणीकपातीचा कालावधीही वाढू शकतो.

१९ जुलैपर्यंत पाऊस येणार नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी तीन दिवस शहरात पाणीपुरवठा होणार नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच जलसाठ्यांची पातळी अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी व जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कळविण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १५ जुलैपर्यंत २८ टक्के पाऊस कमी झाला. त्यामुळे डेड स्टॉकमधील मंजूर कोटाही संपला. यासंदर्भात सोमवारी जलप्रदाय समिती व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. यात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. पाणी कपातीच्या दिवशी शहरात कुठेही टँकरने पाणीपुरवठा होणार नाही. दरम्यान, पाणी कपातीच्या दिवशी कन्हान येथून पाणी घेण्यात येणार असल्याने नेहरूनगर, लकडगंज झोनमध्ये १०० टक्के तर, आसिनगर व सतरंजीपुरा झोनमध्ये ५० टक्के पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. मात्र, उर्वरीत सहा झोनमध्ये पाण्याचा एक थेंबही वितरित करण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पाण्याचे व्हॉल्व सुरू करण्यावर मनपाचे नियंत्रण नाही. त्यामुळे कुठे पाणी येईल हेही सांगता येणार नाही, अशी पळवाटही नेत्यांनी शोधली.

मुंबई, पुणे व राज्यातील इतर मनपात उन्हाळ्यात पाणी कपातीचे संकट असते. परंतु उपराजधानीवर कधीही असे संकट आले नव्हते. केंद्रीय मंत्री व खासदार नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात पावसाळ्यात पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. पुढील आठवडयात पाऊस न आल्यास आठवड्याभरासाठी पाणी कपातीचा निर्णय वाढवावा लागेल असे संकेतही देण्यात आले आहेत. पाणी एक दिवसाआड देण्यात येत असताना सोमवार, मंगळवार, गुरूवार आणि शनिवार असे चार दिवस नेहमीप्रमाणे ६५० एमएलडी पाणीपुरवठा होत राहील अशी ग्वाहीही देण्यात आली. उपमहापौर दीपराज पार्डीकर, नागेश सहारे, दिव्या धुरडे, संजय बंगाले, अतिरीक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी आदी उपस्थित होते.

चौकट..

सत्तापक्षाचे दावे फोल

राज्यातील सर्व शहरात पाण्यासाठी ओरड होत असली तरी नागपुरात पुरेसे पाणी असल्याचे दावे करण्यात येत होते. सत्तापक्ष भाजपकडूनही पाणीकपात होणार नाही, असे छातीठोकपणे सांगण्यात येत होते. त्यामुळे राज्यात व देशात नागपूर पाण्यासाठी सर्वाधिक चांगले शहर असल्याचे सांगितले जात होते. आज मुंबई, पुणेसह इतर शहराच्या रांगेत नागपूर शहर आले आहे. शहरात पाणी वितरणाचे खासगीकरण करण्यात आल्यानंतर नागपूरकरांच्या तक्रारीत कायम भर पडत आहे. आता निसर्गाने व परिस्थितीने का होईना पाणी कपातीची नामुष्की त्तापक्षावर आली आहे.

चौकट..

सभापतींनी दिले होत संकेत

जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी एप्रिल महिन्यातच शहरावर जलसंकट येण्याचे संकेत दिले होते. डेड स्टॉकची परवानगी न मिळाल्यास एक दिवसाआड नव्हे तर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल असे सत्तापक्षाच्या नेत्यांना त्यांनी सांगितले होते. परंतु, पाणीकपातीचा निर्णय घेत विरोधकांच्या हाती आयते कोलित देऊन उन्हाळयात नागपूरकरांचा राग ओढवून घेण्याची सत्तापक्षाची तयारी नव्हती. आज ती भीती खरी ठरली आहे. पावसाने १९ जुलैनंतर हजेरी न लावल्यास हे संकट आणखी गडद होणार आहे.

चौकट..

१५ जुलैला पाण्याची स्थिती अशी :-

………………………………………………….

जलसाठे २०१८ २०१९

……………………………………………………

गोरेवाडा ३१३.८५मी ३११.५७मी

नवेगाव खैरी ३२२.१०मी ३१८.३६मी

खैरी जलाशय ५३६ एमएम १७२एमएम

तोतलाडोह ३९४एमएम १५८एमएम

तोतलाडोह पातळी ४७१.८२०मी ४६०मी

तोतलाडोह जलसाठा १३६.५६८ एमक्युब(१३.४३टक्के) ०

अधिक वाचा : Happy Birthday Katrina Kaif

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...

Best places in India for summer

Looking for the best places to visit in summer,...

Top 10 best summer visiting place in India

India has the top summer vacation places to be...

Celebrate Mahavir Jayanti 2025: A Tribute to the Spiritual Guide of Jainism

Who was Lord Mahavir? Mahavir Jayanti is celebrated as the...