पं.बच्छराज व्यास जयंती निमित्त म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन

bachharaj ji vyas jayanti

नागपूर: ’ध्येय साधना अमर रहे – हम दिन चार रहे न रहे’ या काव्य पंक्तीप्रमाणे आपले संपूर्ण जीवन समाजासाठी व्यतित केलेले भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष, रा.स्व.संघाचे ज्येष्ठ प्रचारक व माजी विधानपरिषद सदस्य पं.बच्छराजची व्यास यांच्या १०२ व्या जयंती निमित्त पं.बच्छराज व्यास चौक (बडकस चैक) स्थित पुतळयाला उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर यांनी म.न.पा.तर्फे माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी माजी सत्तापक्षनेता दयाशंकर ‍तिवारी, झोन सभापती वंदना यंगटवार, नगरसेविका श्रध्दा पाठक, सुमेधा देशपांडे, नगरसेवक श्री.राजेश घोडपागे, प्रा. प्रमोद पेंडके, माजी स्थायी समिती अध्यक्ष सुधीर (बंडू) राऊत, महेंद्र कटारिया, डॉ. महेश ‍तिवारी, अॅड.नचिकेता व्यास, डॉ.सुरेष चांडक, श्रीकांत आगलावे, श्याम चांदेकर, संजय चिंचोळे, दषरथ मस्के, विनोद आष्टीकर, गजानान नेरकर, आशिष भुते, प्रमोद पाकोडे,शिवाजी सिरसाठ, नाना वडाळकर, सुनिल गाढवे, सचिन खोब्रागडे, भावना कोटेचवार, निकिता पराये, सविता उमाठे, सरोज पेशकर, दाधिची समाजाचे ओमप्रकाष आचार्य, पुष्करणा समाजाचे मदनमोहन पुरोहित, लॉयन्स क्लबचे रमेश जिंदल, आदी उपस्थित होते.