नागपूर – सदरमधील उशिरा रात्रीपर्यंत सुरू असलेल्या हॉटेल तुली, व्ही फाइव्हवर पोलिसांचा छापा

नागपूर : पोलिस उपायुक्त विनीता साहू यांनी सदरमधील उशिरा रात्रीपर्यंत सुरू असलेल्या हॉटेल तुली इंटरनॅशनल व हॉटेल व्ही फाइव्ह लोकलवर छापा टाकला. या हॉटेलविरुद्ध सदर पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत चालान कारवाई केली आहे. या दोन्ही हॉटेलमध्ये पब पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विनीता साहू यांना मिळाली.

शनिवारी मध्यरात्री साहू यांच्या नेतृत्वात सदर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे, उपनिरीक्षक राजेंद्र घुगे, एन. फड, शिपाई रेमंड, विजेंद्र व मोनू सय्यद यांनी दोन्ही हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापक संदीप सिराम याला ताब्यात घेतले. निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ डीजे वाजविल्याबाबत विचारणा केली.

याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना आढळून आला नाही. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी तरुण व तरुणी मोठ्या प्रमाणात आढळून आले. चौकशी करून त्यांना सोडण्यात आले.

अधिक वाचा : नागपूर : राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने लग्नापूर्वीच संपविले जीवन