Home Blog Page 80

16 पत्नी, 150 मुलं; तरी म्हणतात व्हायचंय 100 बायकांचा नवरा आणि 1000 पोरांचा बाप

16 पत्नी, 150 मुलं; तरी म्हणतात व्हायचंय 100 बायकांचा नवरा आणि 1000 पोरांचा बाप

हरारे: कुणाला एकच मूल हवं असतं, कुणी हम दो हमारे दो असं ठरवलेलं असतं. कुणी तर आपल्याला क्रिकेट टीमच काढायची आहे, असं मिश्कीलपणे म्हणतंही. यापेक्षा फार फार तर एखाद्या व्यक्तीला किती मूलं हवी असण्याची इच्छा असू शकते? 20, 30, 40, 50… आकडा वाचूनच तुम्हाला गरगरायला लागलं ना?. पण एका व्यक्तीने तर त्याला 1000 मुलं हवी असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. काय, आता तर धक्काच बसला ना तुम्हाला?

आफ्रिकेतील झिम्बाब्वेमध्ये राहणारे 66 वर्षांचे मिशेक न्यानदोरो. त्याच्या 16 बायका आहेत आणि 150 मुलं आहेत. पण इतक्यावर ते समाधानी नाहीत. आता तर त्यांनी सतराव्या लग्नाची तयारी केली आहे. आपल्याला एकूण 100 पत्नी आणि 1000 मुलं हवीत, अशी विचित्र इच्छा या त्यांनी ठेवली आहे.

मिशेक मशोनालँड सेंटर प्रांतातील बायर जिल्ह्यात ते राहतात. ते दुसरं काहीच काम करत नाही. आपल्या पत्नींना समाधानी ठेवणं हाच आपल्या जॉब असल्याचं ते सांगतात. त्यांच्या पत्नी वय झाल्यानंतर त्यांच्याशी नीट लैंगिक संबंध ठेवू शकत नाही, त्यामुळे ते तरुण महिलांशी लग्न करावं लागतं. त्यासाठी त्यांनी शेड्युलही तयार केलं आहे. प्रत्येक रात्री ते चार पत्नींसोबत शारीरिक संबंध ठेवतात.

मिशेकनं सांगितलं, माझ्याकडे कोणताच जॉब नाही. पत्नींना आनंदी ठेवणं हेच माझं काम आहे. 150 मुलांमुळे माझ्यावर कोणताही ताण नाही उलट मला याचा फायदाच झाला आहे. कारण मला माझ्या मुलांकडून गिफ्ट्स मिळत राहतात.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो तरी कसा. तर हे कुटुंबं शेती करतं. या मिशेक यांची सहा मुलं झिम्बाब्वेच्या नॅशनल आर्मीत काम करतात. दोन मुलं पोलिसात आहे आणि 11 मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. त्यांच्या 13 मुलींची लग्नही झाली आहेत.

2015 साली त्यांनी शेवटचं सोळावं लग्न केलं होतं. त्यानंतर देशातील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी आपल्या लग्नात ब्रेक घेतला. आता 2021 मध्ये सतराव्या लग्नाची प्लॅनिंग करत आहे. मृत्यूआधी त्यांना एक हजार मुलं जन्माला घालायची आहेत.

मिशेक हे फक्त आपल्या लैंगिक समाधानासाठीच नव्हे तर देशसेवा म्हणून करत असल्याचं ते सांगतात. मिशेक हे झिम्बाब्वेच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. 1964 ते 1979 पर्यंतच्या रोडेशियन बुश वॉरचा ते भाग होते. 1983 मध्ये त्यांनी आपला प्रोजेक्ट सुरू केला. या लढाईत जी जीवित आणि वित्तहानी झाली, त्यासाठी मिशेक यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्या देशाचं लोकसंख्या वाढवण्यात ते मदत करत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे.

कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास तो बरा होतो, डॉ. अरुण भिसे यांचा दावा

कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास तो बरा होतो, डॉ. अरुण भिसे यांचा दावा

अहमदनगर: भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशात दररोज तीन लांखांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गावर अद्याप औषध तयार झालेलं नाही. कोरोना प्रतिबंधक लसींद्वारे लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. कोरोनावरील उपचारांसाठी एकीकडे रेमडेसिव्हीर आणि इतर औषधांची कमतरता जाणवतं आहे. या परिस्थितीत कोरोना रूग्णांना बरे करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगावचे डॉ. अरुण भिसे यांनी अजब फंडा वापरला आहे. कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास तो बरा होतो, असा दावा डॉ. अरुण भिसे यांनी केला आहे.

डॉ. अरुण भिसे यांचा दावा काय?
डॉ. अरुण भिसे यांनी त्यांच्याविषयी फिरत असलेल्या पोस्टबद्दल स्पष्टीकरण दिलं. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर तीव्रतेनुसार टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार औषध घ्यावीत. ज्या दिवशी तुमच्या तोंडाची चव जाईल, जेवण कमी होईल त्या दिवसापासून अल्कोहोल ज्यामध्ये 40 टक्के पेक्षा जास्त आहे, असं कोणतेही म्हणजेच देशी दारु, व्होडका, ब्रँडी किंवा विस्की या पैकी कोणतीही एक दारु 30 मिली आणि 30 मिली पाणी पेशंटला जेवणाअगोदर पिण्यास द्यायचं आहे. पेशंट गरोदर आणि लिव्हर संबंधी आजार नसला पाहिजे. दारु आणि पाणी याचं मिश्रण डॉक्टरांच्या सल्ल्यानं द्यावं, असं आवाहन डॉ. अरुण भिसे यांनी केलं आहे.

कोरोना विषाणू आणि अल्कोहोलचा संबंध काय?
पेशंटला दारु का द्यायची याच्या मागचं शास्त्रीय कारणं सांगताना ते म्हणतात. कोरोना विषाणूचं वरचं आवरण लिपीडचं आहे. हे आवरण अल्कोहोलमध्ये विरगळत आणि विषाणू निष्क्रीय होतो. त्यामुळे आपण हाताला सॅनिटायझर वापरतो. दारु शरिरात घेतल्यानंतर ती रक्तवाहिन्यांमध्ये घेतली जाते. तिथून ती 30 सेकंदात दारू सर्व शरिरात पोहोचते. फुप्फुसात दारु पोहोचल्यानंतर दारुचा हवेशी संपर्क झाल्यानंतर, दारु हवेद्वारे बाहेर पडते. या प्रक्रियेदरम्यान ज्याठिकाणी विषाणू असेल तो आवरण गळून पडल्यामुळे निष्क्रीय होतो. दारु ही आयुर्वेदात आसव प्रवर्गात येते. दारु ही भूक न लागण्यावर रामबाण समजली जाते. कोरोना काळात रुग्ण दाखल झाल्यावर मानसिक दबाव असतो. तो दबाव कमी करण्याचं काम दारु करत असते, असं डॉ. अरुण भिसे यांनी सांगितलं आहे.

40 ते 50 पेशंटला सल्ला दिला
डॉ. अरुण भिसे यांनी आतापर्यंत 40 ते 50 जणांना दारु घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी तो मान्य केल्याची माहिती भिसे यांनी दिली. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि दारुचं औषधी प्रमाण घेण्यास सांगतिलं. त्याप्रमाणं 40 ते 50 पेशंट बरे झाले आहेत. त्यापैकी 10 रुग्ण गंभीर होते, ते बरे झाले, आतापर्यंत एकाचाही मृत्यू झाला नाही, असं अरुण भिसे यांनी सांगितलं आहे. डॉ. अरुण भिसे यांच्या दाव्याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

जुलैपूर्वी कोरोनाची दुसरी लाट ओसरणार नाही, डॉ. शाहिद जमील यांचा दावा

जुलैपूर्वी कोरोनाची दुसरी लाट ओसरणार नाही, डॉ. शाहिद जमील यांचा दावा

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा वेग पहिल्या लाटेपेक्षा कमी आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरण्यासाठी वेळ लागणार असून जुलैपूर्वी ही लाट जाणार नसल्याचा दावा प्रसिद्ध व्हायरलॉजिस्ट शाहिद जमील यांनी केला आहे.

डॉ. शाहिद जमील यांनी मंगळवारी एका ऑनलाईन कार्यक्रमाला संबोधित करताना हा दावा केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठला आहे, असं म्हणणं घाईचं होईल. कोरोनाच्या ग्राफनुसार कर्व्ह चपटा असेल. परंतु तो खालच्या दिशेने सहज जाणार नाही. त्यामुळे जुलैपर्यंत कोरोना विरोधातील लढा सुरू राहिल असं चित्रं आहे, असं सांगतानाच आपल्याला रोजच मोठ्या प्रमाणावरील कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागणार आहे, असं जमील यांनी सांगितलं.

डेथ रेटचा डेटा चुकीचा
पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत होती. यावेळीही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. आज कोरोना रुग्णांची संख्या 96 हजार किंवा 97 हजार नाहीत. तर 4 लाखाहून अधिक आहे. त्यामुळे वेळही लागणार आहे, असं सांगतानाच माझ्या आकलनानुसार भारताचा डेट रेटचा डेटा पूर्णपणे चुकीचा आहे, असा दावाही त्यांनी केला.

लोकांनी कोरोना फैलावला
यावेळी त्यांनी कोरोना संसर्ग का फैलावला याचंही विवेचन केलं. लोकांनीच कोरोना संसर्ग फैलावला. त्यांनी कोरोना नियमांचं पालन केलं नाही, त्यामुळे कोरोना फैलावला. भारतातील लोकांनी प्रतिकारशक्ती विकसित केल्याचं आपण डिसेंबरपर्यंत मानत होतो. त्यामुळे लग्न सोहळे झाले आणि सुपर स्प्रेडिंगच्या घटना वाढल्या. कोरोना फैलावण्यासाठी धार्मिक कार्यक्रम आणि निवडणूक रॅलीही कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं. फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे केवळ दोन टक्के व्हॅक्सीन कव्हरेज होतं. व्हॅक्सीन सुरक्षित आहे आणि त्याचा दुष्परिणाम अत्यंत कमी आहे. त्यामुळे सर्वांनी व्हॅक्सिन घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

नऊ महिन्याच्या गर्भवतीसह बाळाचा मृत्यू , कारण वाचून काळजाचा ठोका चुकेल!

नऊ महिन्याच्या गर्भवतीसह बाळाचा मृत्यू , कारण वाचून काळजाचा ठोका चुकेल!

गडचिरोली : करोनाच्या भीषण संकटामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यूचा तांडव सुरू असताना गडचिरोलीमध्ये काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार समोर आला आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे नऊ महिन्याच्या गर्भवतीसह बाळाचा मृत्यू झाल्याची घटना 9 मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या कोर्ला गावात हा प्रकार समोर आला आहे. पुष्पा राकेश वेलादी वय (23) असं त्या मृत महिलेचं नाव आहे. तिची ही पहिलीच प्रसूती होती.

मिळालेल्या माहितीनुसार पुष्पा राकेश वेलादी ही मूळची सिरोंचा तालुक्यातील कोर्ला या अतिदुर्गम गावातील रहिवासी असून तिचे लग्न लगतच्या छत्तीसगड राज्यातील कोत्तागुडम इथं झालं. आदिवासी रिवाजाप्रमाणे बाळंतपणासाठी ती आपल्या माहेरी कोर्ला इथं आली होती. 9 मे रोजी रविवारी पहाटेच्या 3 वाजताच्या दरम्यान तिला प्रसुतीकळा सुरू झाल्या.

यावेळी गरोदर महिलेच्या भावाने त्याच क्षणी गावातील उपकेंद्रात जाऊन नर्सला माहिती दिली. मात्र, ती तिने उशिरा येऊन सलाईन लावल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याने रविवारी सकाळी दुचाकीने जवळपास 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या झिंगानूर गाठून रुग्णवाहिका आणली आणि परत प्रसूतीसाठी झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं.

मात्र, झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदयकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून लगेच उपजिल्हा सामान्य रुग्णालय अहेरी इथं जाण्यास सांगितलं. झिंगाणूर ते अहेरीचं अंतर जवळपास 90 किलोमीटर आहे. इतकंच नाही तर सगळ्या रस्त्यांवर खड्डे आहेत. यामुळे गर्भवती महिलेची प्रकृती अधिकच खराब झाली.

महिलेसोबत बाळाचा मृत्यू                                                                                                      कसेबसे तिला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. इथल्या डॉक्टरांनी तिला लगेच ऑक्सिजन लावून उपचार करण्यास सुरुवात केली पण तोच महिलेने अखेरचा श्वास घेतला. महिलेला तिच्याच गावात योग्य उपचार मिळाले असते तर आज हा नाहक बळी गेला नसता. सगळ्यात गंभीर म्हणजे यामध्ये महिलेच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे                                                                              गडचिरोली जिल्ह्यात याआधीही एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात अश्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, दुर्गम भागात अजूनही आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकली नाही. इतकंच नाहीतर स्थानिक पातळीवर काम करणारे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गरोदर मातांची योग्य नोंदणी आणि तपासणी होतं नसल्याची बोंब सुरू आहे.

भ्रमणध्वनी सेवेचा अभाव, रस्त्यांची दुर्दशा, रुग्णवाहिकेचा अभाव, रिक्त पदांचा डोंगर अशा अनेक समस्यांमुळे ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. आजवर अनेक लोकांना उपचाराविना आपले प्राण गमवावे लागले असल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर सरकारनं तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे २ आमदार राजीनामा देणार?

मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे २ आमदार राजीनामा देणार?

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Election) भारतीय जनता पार्टीचे २ आमदार लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, भाजपाचेआमदार जगन्नाथ सरकार आणि दिनहाटा येथून आमदार निसिथ प्रमाणिक आमदारकी सोडण्याच्या तयारीत आहेत. हे दोघंही पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्ष बिमान बनर्जी यांच्याकडे येत्या २ आठवड्यात राजीनामा देऊ शकतात. भाजपा नेतृत्वाला वाटतंय की, या दोघांनी खासदार म्हणून काम सुरु ठेवावं कारण एका मतदारसंघाऐवजी ७ मतदारसंघात लोकांची काम करून पक्ष वाढवता येईल.

जगन्नाथ सरकार पश्चिम बंगालच्या राणाघाट लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत तर निसिथ प्रमाणिक हे २०१९ च्या निवडणुकीत कूच बिहार लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या या २ आमदारांच्या राजीनाम्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेतील एकूण ५ जागा रिक्त राहतील. मुर्शिदाबादच्या शमशेरगंज आणि जंगीपर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या मृत्यूनंतर निवडणूक घेता आली नव्हती. तर उत्तरी २४ परगनाचे खारदा येथे आमदार म्हणून निवडून आलेले तृणमूल काँग्रेसचे(TMC) काजल सिन्हा यांचं विजयाचा जल्लोष करण्यापूर्वीच निधन झालं.

मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की, विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले खासदार हे आमदारकी कायम ठेवणार की राजीनामा देणार? आता या दोन्ही खासदारांनी पक्षाच्या सांगण्यावरून आमदार पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बंगालमध्ये भाजपाने ४ खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. यातील २ जण जिंकले तर दोघांचा पराभव झाला. विजयी उमेदवार निसिथ प्रमाणिक आणि जगन्नाथ सरकार यांनी जर आमदारकी कायम ठेवली तर त्यांच्या रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघात पुन्हा फेरनिवडणूक घ्यावी लागू शकते. त्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता लोकसभा निवडणुकीत २ जागा कायम राहतील का याबाबत भाजपाला चिंता वाटते. कारण २०२१ च्या निकालात चित्र बदललं आहे. ममता बॅनर्जी यांनी २१३ जागा जिंकत राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार                                                                                                पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जोरदार राजकीय हिंसाचार घडला. २ मे रोजी निकाल आल्यानंतरही हिंसाचाराच्या घटना थांबल्या नाहीत. भाजपाच्या दाव्यानुसार, राजकीय हिंसाचारात पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचाराच्या घटनांसाठी भाजपाने तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. २ मे रोजी निकाल आला त्यानुसार तृणमूल काँग्रेसला २१३ जागांवर मोठा विजय मिळाल्यानं पश्चिम बंगालमध्ये निर्विवाद बहुमत प्राप्त झालं आहे. जर भाजपाला ७७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एका जागेवर अपक्षाने बाजी मारली तर १ जागा राष्ट्रीय सेक्युलर मजलिस पार्टीच्या खात्यात गेली आहे. अनेक दशकांपासून पश्चिम बंगालमध्ये राज्य करणाऱ्या काँग्रेस आणि डाव्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

गोपनीय माहिती, गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडसोबतचं चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा WhatsApp चं भन्नाट फिचर

WhatsApp group

मुंबई : तुम्हाला जर WhatsApp वर आलेले खासगी मेसेज इतरांपासून लपवायचे असतील परंतु त्यासाठीची ट्रिक माहिती नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. किंवा जे युजर्स WhatsApp चॅटच्या सुरक्षिततेसाठी थर्ड पार्टी अ‍ॅप वापरतात त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp त्यांच्या युजर्सना अ‍ॅपमध्ये चॅट सुरक्षित ठेवण्यासाठीचं एक फीचर देतं. त्यामुळे तुमचं WhatsApp चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची आवश्यकता नाही.

WhatsApp-ios

आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट प्रायव्हसी कशी वाढवता येईल, याबाबतची माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही तुमच्या अ‍ॅपवर फिंगरप्रिंट लॉक लावू शकता. खास बाब म्हणजे हे लॉक अगदी सहजपणे अ‍ॅक्टिव्हेट करता येईल आणि तितक्याच सहजपणे ते वापरता येईल. (here is how to lock your private messages on whatsapp with fingerprint on android phone)

अ‍ॅपमध्येच तुमचं चॅट सुरक्षित ठेवा

  • सर्वात आधी तुम्ही तुमचं व्हॉस्टअ‍ॅप ओपन करा. होम पेजवर उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात तुम्हाला 3 डॉट्स दिसतील, त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील, त्यापैकी Settings वर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर Account चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता Privacy या पर्यायावर क्लिक करा.
  • Privacy वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील, त्यापैकी सर्वात शेवटी Fingerprint Lock असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करुन Unlock with fingerprint वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला फिंगरप्रिंट रजिस्टर करण्यास सांगितंल जाईल. फिंगरप्रिंट रजिस्टर या पर्यायावर क्लिक करुन तुम्ही तुमच्या आवडीनुसार फिंगंरप्रिंट लॉक टाईम सेट करु शकता.
  • यामध्ये तुम्हाला तीन पर्याय मिळतील, तुमच्या सोयीनुसार तुम्ही Immediately, After 1 minute, After 30 Minutes या तीनपैकी एकाची निवड करु शकता.
  • यामध्ये तुम्ही Immediately हा पर्याय निवडलात तर अ‍ॅप बंद होताच तुमचं लॉक अ‍ॅक्टिव्हेट होईल. तर After 1 minute, After 30 Minutes यापैकी कोणताही एक पर्याय निवडल्यानंतर अनुक्रमे 1 मिनिट किंवा 30 मिनिटांनंतर तुमचं लॉक अ‍ॅक्टिव्हेट होईल.

धक्कादायक घटना! महिलेनं दिराच्या मदतीनं केली पतीची दगडानं ठेचून हत्या

धक्कादायक घटना! महिलेनं दिराच्या मदतीनं केली पतीची दगडानं ठेचून हत्या

पुणे: महिलेने दिरासोबत मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील भोरमधून समोर आली आहे. महिलेनं दिराच्या मदतीनं पतीची दगडानं ठेचून हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी दिरासह आरोपी महिलेस अटक केली आहे. हत्येच नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून आरोपींची चौकशी सुरू आहे.

देविका अमोल रांजाळे आणि किरण शंकर रांजाळे अशी अटक केलेल्या महिलेचं आणि तिच्या दिराचं नाव आहे. आरोपी दीर-भावजय यांनी अमोल शंकर रांजाळे याची दगडानं ठेचून हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील जांभूळवाडी येथील रहिवासी असणारा किरण रांजाळे हा काही दिवसांपूर्वी आपली भावजय देविकाला घेऊन भोर तालुक्यातील धानवली याठिकाणी आपल्या बहिणेकडे आला होता. यानंतर रविवारी आरोपी पत्नी देविकाचा पती अमोलही याठिकाणी आला होता.

दुपारी अडीचच्या सुमारास तिघंही बहिणीच्या घराबाहेर पडले. आपल्या घरी परत येत असताना काही कारणांवरून त्यांच्यात वाद झाला. यामुळे आरोपी पत्नी देविकानं आपला दीर किरण शंकर रांजाळे याच्या मदतीनं आपल्या पतीची हत्या केली. आरोपींनी मृत अमोलची दगडानं ठेचून निर्घृण हत्या केली. यानंतर त्यांनी मृत अमोलचा मृतदेह धानवलीच्या सोनजाई मंदिराजवळ फेकून दिला.

गावकऱ्यांना हा मृतदेह दिसल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. तर अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी दीर-भावजय यांना अटक केली आहे.

Nagpur news: वीज वसाहत परिसरात आढळले नवजात शिशु

Nagpur news: वीज वसाहत परिसरात आढळले नवजात शिशु

काेराडी : वीज वसाहत परिसरातील साेपाेरेक्स काॅलनीत उजाड ठिकाणी सिमेंट ओट्यावर नवजात शिशु आढळून आले. ही घटना मंगळवारी (दि.११) सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, पाेलिसांनी एका कुमारी मातेला ताब्यात घेतले असून, शिशु व कुमारी मातेला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळच्या सुमारास माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी लगेच काेराडी पाेलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. नवजात शिशु एक दिवसाचे असून, पाेलिसांनी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. स्त्री लिंगी असलेल्या शिशुची प्रकृती चांगली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. वीज वसाहतीचा साेपाेरेक्स काॅलनीचा भाग निर्जन आहे. या ठिकाणी वसाहत नाही. या नवजात बालकाच्या निर्दयी मातापित्याचा शाेध घ्यावा, अशी मागणी विविध स्तरातून झाली. तपासादरम्यान प्राप्त पुराव्याच्या आधारे पाेलिसांनी काही वेळेतच प्रकरणाचा छडा लावत एका कुमारी मातेला ताब्यात घेतले असून, तिच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पाेलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात काेराडी पाेलीस तपास करीत आहेत.

संतापजनक! ‘जल्लाद आहेत सारे, माझ्या बाबूला मारलं त्यांनी’, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने केला धक्कादायक खुलासा

India Reports 2,430 New COVID-19 Cases | Our Nagpur
India Reports 2,430 New COVID-19 Cases | Our Nagpur

बिहारच्या मधुबनीमध्ये राहणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर रोशन चंद्र याचं कोरोनामुळे निधन झालं. पटणा येथील राजेश्वर हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. याआधी भागलपूरच्या ग्लोकल हॉस्पिटलमध्ये त्याच्या उपचार सुरू होते. तिथे तब्येत आणखी बिघडल्याने त्याला पाटण्याला हलवण्यात आलं होतं. पतीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी रूचीने ज्याप्रकारे रडली आणि आलेले वाईट अनुभव सांगितले ते वाचून मनाला चटका बसतो. अंगावर शहारे आणणारे खुलासे करत रूचीने सांगितले की, पतीच्या उपचारासाठी तिला छेडछाडही सहन करावी लागली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रूचीने पटना येथील राजेश्वर हॉस्पिटलमधील एका डॉक्टरवर छेडछाड केल्याचा आरोप लावला आहे. सोबतच सांगितले की, तिच्या पतीला उपचारासाठी त्रास दिला गेला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आरोप आहे की, हॉस्पिटलमधील लोक नेहमीच ऑक्सीजन सप्लाय बंद करत होते. जेणेकरून लोकांनी जास्त पैसे देऊन ऑक्सीजन विकत घ्यावं. रूचीनेही जास्त पैसे देऊन ऑक्सीजन खरेदी केलं. पण ती पतीला वाचवू शकली नाही.

रूचीने पुढे सांगितले की, ज्याप्रकारे तिच्या पतीचा मृत्यू झाला त्याप्रमाणे आता इतर कुणाचा मृत्यू होऊ नये अशी तिची इच्छा आहे. शेवटी रडत रडत ती म्हणाली की, डॉक्टरांच्या भरोशावर रूग्णांना सोडलं जाऊ शकत नाही. जल्लाद आहेत सारे, माझ्या बाबूला मारलं त्यांनी.

ही घटना समोर आल्यावर प्रशासन खळबळून जागं झालं. भागलपूर एसएसपी गुडिया नताशा यांनी स्वत: ग्लोकल हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रकरणाची माहिती घेतली. सोबतच चौकशीचे आदेशही दिले. कथितपणे हॉस्पिटल प्रशासनाने आरोपी डॉक्टरला नोकरीहून काढलं. पण अजूनही या घटनेवर पूर्ण कारवाई होणं बाकी आहे. आशा आहे की, दोषींना शिक्षा मिळेल आणि कुणालाही रोशनप्रमाणे जीव गमवावा लागणार नाही.

Coronavirus Updates: महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाउन?

Coronavirus Updates: महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाउन?

करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून १५ मे पर्यंत निर्बंध कायम आहेत. ठाकरे सरकारकडून आधी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता, मात्र नंतर हा लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान परिस्थिती अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी राज्य सरकार ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याची शक्यता असून बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या ११ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक जिल्हे सध्या संपूर्ण लॉकडाउनची तयारी करत आहे.

अस्लम शेख काय म्हणाले?
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना लॉकडाउनसंबंधी भाष्य केलं आहे. “आत्ताची जशी स्थिती आहे तसंच आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारण्यासंबंधी विचार करण्यात येईल. लॉकडाउन पुढे वाढवायचा असेल तर त्यात कोणते निर्बंध उठवू शकतो, कोणत्या गोष्टींना परवानगी देऊ शकतो, कोणते निर्बंध कडक करायचे याचा विचार करावा लागेल. आपण अभ्यास करत असून सर्वांची मतं घेत आहोत, त्यामुळेच यश मिळत आहे. टास्क फोर्स काय शिफारस करतं यासंबंधी कॅबिनेटमध्ये चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी लॉकडाउनचा फायदा झाल्याची माहिती दिली आहे. “लॉकडाउनमुळे मुंबई आणि महाराष्ट्राचा फायदा झाला आहे. लॉकडाउनआधी मुंबईची परिस्थिती, रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. दुसरा लॉकडाउन करत असताना तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपली तयारी सुरु होती. जम्बो सुविधा उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु झाली आहे, कामं सुरु झाली आहेत. महाराष्ट्रात आता रेमडसेविरसाठी पहिल्यासारखी मारामारी नाही,” अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.

Coronavirus Nagpur: एप्रिलमध्ये कोरोनामुळे झाला सात मुलांचा मृत्यू

Nagpur sees 17 new Corona cases

नागपुर: करोनाची तिसरी लाट लहान मुलांना लक्ष्य करणार असल्याचे बोलले जात असताना, ती येण्याच्या आधीच गेल्या एप्रिल महिन्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शून्य ते २० या वयोगटातील सात मुलांचा मृत्यू झाला आहे.

करोना लहान मुलांना काही करीत नाही, कारण त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते, असे पहिल्या लाटेपर्यंत बोलले जायचे. मात्र, दुसऱ्या लाटेतच करोनाने लहान मुलांनाही कवेत घेणे सुरू केले. त्यामुळे लहान मुले बाधित होण्याची संख्या हजाराच्यावर आहे. त्यातही शून्य ते २० वयोगटात सात जणांचा मृत्यू होणे हेही गंभीर समजले जात आहे.

एप्रिल महिन्यात मेडिकलमध्ये जे १,३६७ मृत्यू झाले त्यात पुरुषांची संख्या अधिक आहे. महिनाभरात ८५५ पुरुषांनी तर ५१६ महिलांनी जीव गमावला. करोनामुळे जे मृत्यू झाले, त्यात ५७९ रुग्णांना इतर गंभीर आजार असल्याचेही आढळून आले आहे.

यसंदभार्त मेडिकलच्या औषधीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले की, सध्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. यात लहान मुले व पौगंडावस्थेतील मुले यांना धोका असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांना सांभाळून ठेवले पाहिजे. ते केले तर तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी राहू शकतो.

वयोगटानुसार मृत्युसंख्या

शून्य ते २० : ७

२० ते ३० : ५५

३० ते ४० : १४४

४० ते ५० : २६५

५० ते ६० : ३६४

६० ते ७० : २९६

७० वर्षांच्या पुढे : २४६

Coronavirus: नियम आणि शिस्तीचे पालन करून हे ९० गावं झाले करोनामुक्त

Coronavirus: नियम आणि शिस्तीचे पालन करून हे ९० गावं झाले करोनामुक्त

नागपूरः करोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट राज्यात हाहाःकार माजवत आहे. प्रादुर्भावाच्या तांडवाने सर्वच जिल्हा होरपळून निघत असताना नागपूर विभागातील भंडारा जिल्हा मात्र करोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्ह्यातील ९० गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या ९० गावांमधील लोकांनी नियम आणि शिस्तीचे पालन करून दैनंदिन व्यवहार सुरू ठेवल्याने करोनातून मुक्ती मिळविली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका विदर्भाला बसला होता. नागपुर तर करोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, आता तिथंही रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. सोमवारी भंडारा जिल्ह्यात २३९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १०१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील या ९० गावांनी जिद्दीच्या जोरावर करोनावर मात केली आहे.

असं रोखलं करोनाला                                                                                                            करोना विषाणू प्रादुर्भावाची साखळी मोडून काढण्यासाठी या गावांनी काही नियम घालून दिले. सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच मास्क वापरणे सक्तीचे केले. सोबतच गावात वेळोवेळी सॅनिटायझ करण्यात आले आहे. जे लोक कामानिमित्त घराबाहेर पडत होते त्यांचा वेळोवेळी फॉलोअप घेऊन त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवलं गेलं.

लसीकरणावर भर                                                                                                        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकाऱ्याने गावात लसीकरणावरही भर दिला गेला. त्यामुळे करोना विषाणूला गावांच्या वेशीबाहेरच रोखून धरण्यात यश आलंय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी १८ हजारांहून अधिकच्या रुग्णसंख्येची नोंद होणाऱ्या विदर्भाला सोमवारी मोठा दिलासा मिळाला. दिवसभरात तपासण्यात आलेल्या अहवालात ७ हजार ५२० पॉझिटिव्ह आढळले. तर १४ हजार ८१४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले. आजवर ९ लाख ७६ हजार २७९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील ८ लाख ४३ हजार ९९ बरे तर १६ हजार ७८२ उपचारादरम्यान दगावले आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ताला अटक करण्याची केली मागणी, जाणून घ्या कारण

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ताला अटक करण्याची केली मागणी, जाणून घ्या कारण

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबीता ही कायमच चर्चेत असते. बबीताची भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ता साकारताना दिसत आहे. मुनमुन ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच मुनमुनने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सोशल मीडियाद्वारे तिला अटक करण्याची देखील मागणी केली आहे.

मुनमुन दत्ता लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी तिने रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचे आहे. मला भंगी सारखे दिसायचे नाही’ असे मुनमुन व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

भंगी हा शब्द वापरल्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर ट्विटरवर मुनमुनला अटक करावी अशी मागणी केली जात असून #ArrestMunmunDutta टॉप ट्रेंड होताना दिसत आहे.

 

यासंदर्भात मुनमुनने ट्विटरद्वारे माफी मागितली आहे. ‘हे मी काल पोस्ट केलेल्या एका व्हिडीओ संदर्भात आहे. या व्हिडीओमध्ये मी वापरलेल्या शब्दाचा वेगळा अर्थ काढला जात आहे. कोणाच्या भावना दुखावण्यासाठी किंवा धमकी देण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या भाषेच्या अडथळ्यामुळे मला या शब्दाबद्दलचे चुकीचे ज्ञान होते. मला या शब्दाचा अर्थ कळताच मी व्हिडीओमधून तो भाग काढून टाकला. मी प्रत्येक जात, पंथ आणि लिंगाच्या व्यक्तींचा आदर करते. समाजात किंवा राष्ट्रासाठी त्यांचे अपार योगदान आहे याची मी कबुली देते. मी नकळतपणे वापरलेल्या शब्दासाठी मनापासून माफी मागते’ या आशयाची पोस्ट तिने केली आहे.

No one should collect funds for Vaccination: Divisional Commissioner

No one should collect funds for Vaccination: Divisional Commissioner

Nagpur: As we know the Union Government and the State Government are offering free coronavirus preventive vaccination at various centres. In view of this, divisional commissioner Sanjeev Kumar appealed that the local self-governing bodies or any other private organisations should not collect funds for vaccination.

As per the guidelines of the Central Government, free vaccines are being given to people above 45 years and about 18 years who have done registration on Cowin app. No fee is charged at the centre authorized by the government. No one should collect funds for vaccination. Various registered organisations, social organisations; private and registered establishments are extending necessary medical aid. The NGOs have taken a large scale initiative for this. No fund should be collected for vaccination or to purchase vaccines.

धुम्रपानाची सवय मोडण्यासाठी या व्यक्तीने पिंजऱ्यात बंद केले आपलं डोकं-तोडं, चावी असते पत्नीकडे!

धुम्रपानाची सवय मोडण्यासाठी या व्यक्तीने पिंजऱ्यात बंद केले आपलं डोकं-तोडं, चावी असते पत्नीकडे!

काही सवयी फारच वाईट असतात. धुम्रपान त्यापैकीच एक वाईट सवय. अनेक लोक धुम्रपान सोडण्याचं संकल्प करतात. पण काही दिवसांनी त्यांचा निर्णय कमजोर पडतो. तशीही वाईट सवय सोडवणं फार कठिण मानलं जातं. अशात काही लोक अशा सवयी सोडवण्यासाठी काही जुगाड करतात. असाच एक जुगाड एका व्यक्तीने केलाय. त्याने धुम्रपानाची सवय मोडण्यासाठी तोंडावर एक खास प्रकारचा पिंजरा बनवला आहे.

रिपोर्टनुसार, तुर्कीच्या Ibrahim Yucel अनेक वर्षांपासून धुम्रपान करत होते. पण जेव्हा त्यांनी यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चांगलाच त्रास झाला. पण त्यांनी हार मानली नाही आणि एका खासप्रकारच्या हेल्मेटने आपलं डोकं-तोडं कव्हर करून घेतलं. जेणेकरून ते सिगारेट ओढू शकणार नाही.

इब्राहिम यांना मोटारबाइक रायडर्सच्या हेल्मेटवरून याची कल्पना सुचली. हा अनोखा पिंजरा त्यांनी १३० फूट कॉपर वायरपासून तयार केला आहे. इब्राहिम यांनी हे हेल्मेट थोडं वेगळं बनवलं आहे. बाइक रायडर्स त्यांना हवं तेव्हा त्यांचं हेल्मेट काढू शकतात. पण इब्राहिम यांना त्यांचं हेल्मेट काढण्यासाठी चावीची गरज पडते. आणि ती चावी त्यांच्या पत्नीकडे राहते.

इब्राहिम १६ वर्षांचे असतानापासून दिवसातून २ पॅकेट सिगारेट ओढत होते. पण जेव्हा फुप्फुसाच्या कॅन्सरने जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा त्यानी परिवारासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी धुम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला. इब्राहिम यांचा हेल्मेट पक्ष्यांच्या पिंजऱ्यापेक्षा कमी नाही. ते हा पिंजरा केवळ खाता-पितानाच काढतात. पण त्यांना हा पिंजरा काढण्यासाठी पत्नी किंवा मुलांची मदत घ्यावी लागते.

Coronavirus Nagpur: म्युकरमायकोसिसमुळे ३५ रुग्णांवर आली डोळा काढण्याची वेळ

नागपुरात वाढला धोका, म्युकर मायकोसिसचे एकूण १०८६ रुग्ण आढळले

नागपूर: कोरोनातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. अनियंत्रित मधुमेह व स्टेराॅईडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये हा आजार वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वी वर्षातून एखाददुसरा म्युकरमायकोसिसचा रुग्ण आढळायचा. परंतु आता आठवड्याला साधारण २० ते २५ रुग्णांची नोंद होत आहे. धक्कादायक म्हणजे, मागील तीन महिन्यात खासगी आणि शासकीय रुग्णालये मिळून ३५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करून एक डोळा काढण्याची वेळ आली.

कोरोना विषाणूवर यशस्वी उपचारानंतर म्युकरमायकोसिससारख्या आजाराची गुंतागुंत वाढत असल्याने आरोग्य क्षेत्रात चिंता वाढली आहे. म्युकरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमधील अनियंत्रित मधुमेह, रक्तदोष, एखाद्या अंगाचे प्रत्यारोपण, एड्स व कुपोषित व्यक्तीलाही या आजाराचा धोका असतो. याशिवाय स्टेरॉईडचा हेवी डोज घेणाऱ्यांमध्येही हा आजार दिसून येतो. साधारण हजार कोरोना रुग्णांमध्ये २० म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजाराचे लवकर निदान झाल्यास हा आजार बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

५० टक्के रुग्णांवर डोळा गमाविण्याची वेळ                                                                              शहरातील एका खासगी रुग्णालयात मागील तीन महिन्यात म्युकरमायकोसिसच्या ६२ रुग्णांची नोंद झाली. यातील ३४ रुग्णांच्या डोळ्याच्या आतपर्यंत फंगस गेल्याने शस्त्रक्रिया करून एक डोळा काढण्याची वेळ आली. साधारण ५० टक्के रुग्णांना आपला डोळा गमवावा लागला. हे सर्व रुग्ण नागपूर जिल्ह्यातील असून, २२ ते ९० वर्षे वयोगटातील असल्याची माहिती संबंधित खासगी रुग्णालयातील डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. मेयोमध्येही एका रुग्णावर शस्त्रक्रिया करून डोळा काढावा लागला.

मेयो, मेडिकल व डेन्टलमध्ये वाढत आहेत रुग्ण                                                                              शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) नोव्हेंबर २०२० ते १० मे २०२१ पर्यंत ३४ रुग्णांची नोंद झाली. यातील १० रुग्णांवर ईएनटी विभागाकडून शस्त्रक्रिया झाल्या. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) म्युकरमायकोसिसच्या नऊ रुग्णांची नोंद झाली असून, यातील सहा रुग्णांवर ईएनटी विभागाने शस्त्रक्रिया केल्या. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (डेन्टल) जानेवारी ते आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ४९ रुग्णांची नोंद झाली. यातील १७ रुग्णांवरील जबड्याच्या हाडावर शस्त्रक्रिया करावी लागली. खासगी रुग्णालयाची शासनदरबारी नोंद होत नसल्याने त्याचा डेटा उपलब्ध होऊ शकला नाही.

लक्षणे                                                                                                                                डोळ्याच्या भागात दुखणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, डोक्याच्या समोरच्या भागात दुखणे, चेहरा व विशेषत्वाने गालावर दुखणे, नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, दात हलणे व दात दुखणे.

घ्यावयाची काळजी                                                                                                              रुग्णांनी लक्षणे दिसताच डोळ्याचे डॉक्टर किंवा कान, नाक व घसा (ईएनटी) तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. वेळीच तपासणी व उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो.

COVID-19 Vaccination: आरोग्य सेतु, Co-WIN वर वॅक्सिनेशन स्लॉट मिळत नाहीये? हे पर्याय ठरतील मदतशीर

6 Easy Steps to Register online for Covid-19 vaccine on CoWin Portal

नवी दिल्ली  : देशात कोरोना व्हायरसविरोधात (Coronavirus) लसीकरण सुरू आहे. परंतु वॅक्सिन सप्लायमधील (Vaccine Supply) कमतरतेमुळे अनेकांना लस मिळवण्यात समस्या येत आहेत. सर्वसामान्यपणे लस घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवर (Co-WIN) रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. पण अधिक लोकसंख्या आणि धिम्या गतीने सुरू असणाऱ्या लशीच्या सप्लायमुळे रजिस्ट्रेशन प्रक्रियेत विलंब होत आहे. लोकांना वॅक्सिनेशनसाठी स्लॉट बुक करण्यासाठी अनेक समस्या येत आहेत. ऑनलाईन प्रक्रिया असल्याने युजर्ससाठी इंटरनेटवर असे अनेक पर्याय आहेत, जे वॅक्सिनच्या उपलब्धतेबाबत आणि अपॉईंटमेंट्सबाबत संपूर्ण माहिती देतात.

मीडिया रिपोर्ट्नुसार, Under45.in ही वेबसाईट टेलिग्राम चॅनेल्सच्या माध्यमातून वॅक्सिन स्लॉटची जिल्ह्यानुसार माहिती देते. हे चेन्नईमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने तयार केलं आहे. एक दुसरा प्लॅटफॉर्म Getjab.in देखील आहे, जो वॅक्सिनेशन अपडेट्स देण्यासाठी उपयोगी ठरतो. याच्या मदतीने लसीकरणासंबंधी आवश्यक अलर्ट्स ई-मेलवर मिळतात.

त्याशिवाय पेमेंट अ‍ॅप पेटीएमवरही (Paytm) वॅक्सिन फाइंडर सुविधेद्वारे मदत होऊ शकते. त्याशिवाय ‘My Government Corona Helpdesk’ वरही युजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) वॅक्सिनची माहिती मिळवू शकतात. यात केवळ उपलब्ध वॅक्सिन स्लॉटबाबत अलर्ट मिळणार नाही.

10 मेपर्यंत सरकारी आकड्यांनुसार, देशात एकूण 17 कोटी 1 लाख 76 हजार 603 लसीकरण झाले आहेत. त्यापैकी पहिल्या डोसची संख्या 13 कोटी 44 लाख 4 हजार 867 इतकी आहे. तर 3 कोटी 57 लाख 71 हजार 736 दुसऱ्या डोसची संख्या आहे.

सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचंही लसीकरण सुरू केलं. मात्र लसीच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांमध्ये या वयोगटातील लसीकरण सध्या रद्द करण्यात आलं आहे.

कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही कोरोना पॉझिटिव्ह झाले तर घाबरू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही कोरोना पॉझिटिव्ह झाले तर घाबरू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

कोरोना व्हायरस महामारीच्या सुरूवातीच्या काळापासून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. लोकांना वाचवण्यासाठी भारत आणि जगातील अनेक देशांमध्ये शोध सुरू आहेत. ज्यांचे निष्कर्ष सायन्स जर्नल आणि इतर प्लॅटफॉर्मवरूनही ते प्रकाशित होत आहेत. अशात नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार, कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही काही लोक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. मेडिकल एक्सपर्ट्सनी याला ‘ब्रेकथ्रू केस’ असं नाव दिलंय. आपल्या देशाबाबत सांगायचं तर याबाबतीत भारतीय लोक बरेच नशीबवान आहेत. कारण भारतात अशा केसेस कमी आहेत.

एक्सपर्ट आणि सरकारचा सल्ला                                                                                                  इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, भारतात अशाप्रकारच्या ब्रेकथ्रू केसेची आकडेवारी केवळ ०.०५ टक्के इतकीच आहे. तेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, जर वॅक्सीनचा पहिला डोज लावल्यानंतर कुणी कोरोनाने संक्रमित होत असेल तर याचा अर्थ हा नाही की, ती व्यक्ती दुसरा डोज घेऊ शकत नाही. अशा लोकांनी फक्त या गोष्टीची काळजी घ्यावी की, दुसऱ्या डोजचं शेड्युल संक्रमणातून ठीक झाल्यावर म्हणजे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर कमीत कमी चार ते आठ आठवड्यांनंतर असावं.

कुणासाठी हे नियम?                                                                                                            आरोग्य मंत्रालयानुसार, असे लोक ज्यांना कोरोना संक्रमणाची सक्रिय लक्षणे आहेत किंवा असे लोक ज्यांच्या शरीरात कोविड-१९ विरोधात अ‍ॅंटीबॉडी आहेत. त्यांच्यासाठी दुसरा डोज घेण्याआधी ४ ते ८ आठवड्यांचा गॅप गरजेचा आहे. तेच प्लाज्मा घेतलेल्या लोकांसोबत जास्त आजारी किंवा इतर आजारांनी ग्रस्त लोकांनीही वॅक्सीनचा दुसरा डोज घेण्यात एक किंवा दोन महिन्यांचा गॅप ठेवावा.

तसेच अमेरिकन रोग नियंत्रण केंद्र म्हणजे CDC नुसार, असे रूग्ण ज्यांना काहीच लक्षणे नाहीत, म्हणजे कोविड-१९ ने ग्रस्त रूग्ण ठीक झाल्यानंतर आपला होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केल्यावर कोरोना वॅक्सीनचा दुसरा डोज घेऊ शकतात.

दरम्यान एक्सपर्ट्सचं असं मत आहे की, वॅक्सीनच्या कार्यप्रणालीचाही आपला एक वेगळा प्रभाव असतो. सर्वांची सुरक्षा सतत आणि चांगली होत रहावी यासाठी वेगवेगळे रिसर्च सुरू आहेत. वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही कुणी कोरोना व्हायरसने संक्रमित होत असेल तर त्यांनी घाबरण्याची गरज नाही.

बापाने मुलाला नपुंसक करण्याच्या गोळ्या दिल्या, नंतर सुनेसोबत केलं अश्लील कृत्य..

बापाने मुलाला नपुंसक करण्याच्या गोळ्या दिल्या, नंतर सुनेसोबत केलं अश्लील कृत्य....

उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशमधील बरेली गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याने स्वतःच्याच मुलाला नपुंसक बनवून सुनेसोबत अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बरेली गावातील एक २८ वर्षीय महिला तेथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यास गेली तेव्हा तेथील पोलिसांना जेव्हा सर्व हकीकत सांगितली तेव्हा पोलिसही ऐकून हैराण झाले. महिलेनं आपल्या सोबत घडलेली घटना सांगितल्यानंतर सर्वांच्या अंगावर काटाच आला.

आरोपी सासऱ्याने आपल्या सुनेला ताब्यात घेण्यासाठी वाटेल ते प्रयोग चालू केले. आपल्याच सुनेवर वाईट नजर ठेवून असणाऱ्या सासऱ्याचे कृत्य जर नवऱ्याला सांगितले तर नवरा विश्वास ठेवणार नाही या भीतीने तिने नवऱ्यालाही काही सांगितले नाही. मात्र सासऱ्यानेनंतर असे काही कृत्य केले की त्यानंतर बाप आणि मुलाच्या नात्याला कालीमा फासणारी घटना घडली.

सासऱ्याने स्वतःच्याच मुलाला नपुंसक करण्यासाठी गोळ्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलाच्या बापाने त्याच्याच सुनेसोबत शारीरिक संबंध ठेवणायास सुरूवात केली. काही दिवसानंतर जेव्हा पीडित सुनेला या वेदना आणि हा त्रास सहन झाला नाही. त्यामुळे पीडित महिलेने पोलीस स्थानकात जाऊन सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

आरोपी सासऱ्यावर पोलीस स्थानकात गुन्हा तर नोंद झाला. मात्र अजूनही पीडित महिलेला न्याय मिळाला नाही. कारण पीडित महिला गुन्हा दाखल करणार असल्याचे समजताच सासऱ्याने सुनेला घरातून हाकलून लावले आणि सुनेचे चारित्र ठिक नसल्याचे सांगत स्व:ताचा बचाव करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. संबंधित पोलीस या घटनेबाबत चौकशी करत असून लवकरात लवकर नेमकं प्रकरण काय आहे, याची तपासणी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

आता WhatsApp च्या माध्यमातून मिळणार घराजवळच्या लसीकरण केंद्राची माहिती; जाणून घ्या प्रक्रिया

आता WhatsApp च्या माध्यमातून मिळणार घराजवळच्या लसीकरण केंद्राची माहिती; जाणून घ्या प्रक्रिया

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असताना लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये गती आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशात 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या तिसऱ्या टप्प्यात 18 ते 45 वयोगटातील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने MyGov Corona Helpdesk ची सुरुवात करण्यात आली असून या चॅटबॉटमध्ये काही सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचा वापर करुन WhatsApp च्या माध्यमातून आता लोकांना आपल्या घराजवळ असलेल्या लसीकरण केंद्राची माहिती मिळणार आहे.

MyGov Corona Helpdesk चा वापर करुन आपण WhatsApp च्या माध्यमातून आपल्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती मिळवू शकतो.

या चॅटबॉटचा वापर कसा करायचा?

  • सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनवर MyGov Corona Helpdesk Chatbot साठी आवश्यक असलेला 9013151515 हा नंबर सेव्ह करा.
  • WhatsApp वरुन या नंबरला नमस्ते किंवा हाय असं टाईप करा.
  • मेसेज टाईप करताच आपल्याला ऑटो रिस्पॉन्स मिळेल. त्यामध्ये एक प्रश्नावली असेल.
  • या प्रश्नावलीमध्ये आपण आपल्या पीन कोडची नोंद करा.
  • पीन कोड नोंद केल्यानंतर आपल्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती आणि लोकेशन आपल्याला मिळेल.

या पद्धतीने आपण आपल्या जवळच्या कोरोना लसीकरण केंद्राची माहिती WhatsApp माध्यमातून मिळवू शकता. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी अधिकृत वेबसाइट COWIN.GOV.IN वर करता येईल.

लसीकरणासाठी आपण ठिकाण निवडू शकतो का?
होय, लसीकरणासाठी कोणत्याही राज्यात आपण नांव नोंद करु शकतो. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे.

एकमेकांची तक्रार घेऊन आलेल्या कपलचं पोलिसांनी ठाण्यातच लावून दिलं लग्न

एकमेकांची तक्रार घेऊन आलेल्या कपलचं पोलिसांनी ठाण्यातच लावून दिलं लग्न

कोटा: कोरोनाकाळ आणि लॉकडाऊनमध्ये अनेक निराश आणि चिंता करण्यास भाग पाडणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, याच काळात घडणाऱ्या काही सकारात्मक घटना सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहेत. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. यात पोलिसांनी रुसलेल्या प्रेमी युगुलाला केवळ मनवलं नाही तर ठाण्याच्या परिसरातच त्यांचं लग्नही लावून दिलं. यानंतर पोलिसांचे आशिर्वाद घेऊन हे जोडपं आपल्या दुचाकीवरुन घरी निघालं. बँड-बाजाशिवायच या जोडप्यानं पोलीस ठाण्यात एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातली.

ही घटना आहे राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडीमधील. मिळालेल्या माहितीनुसार, रामगंजमंडीच्या मारुती नगरमधील रहिवासी असलेली 22 वर्षीय युवती आणि मोतीलाल यांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होत असल्यानं तरुणी प्रियकराच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. यावर पोलिसांनी तिची तक्रार न घेता दोघांना समजावून हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी सोमवारी प्रियकर आणि दोघांच्याही कुटुंबीयांनी समजावलं. नंतर दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीनं ठाण्याच्या परिसरातच असलेल्या एका मंदिरात दोघांना एकत्र आणलं. दोघांनी मंदिरासमोर एकमेकांसोबत जगण्याचं वचन दिलं. यानंतर या जोडप्यानं पोलिसांसह आपल्या कुटुंबीयांचा आशिर्वाद घेतला आणि ते घराकडे रवाना झाले.

यादरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पत्रकारानं पंडितांची भूमिका निभावली आणि काही मिनिटांमध्येच हा विवाह संपन्न झाला. लग्नावेळी दोघांचे कुटुंबीयही तिथेच उपस्थित होते. पोलीस स्टाफनं या दोघांनाही शुभेच्छा दिल्या. अशा बहुतेक प्रकरणांमध्ये पोलिसांची भूमिका अनेकदा नकारात्मक ठरते. मात्र, कोटा पोलिसांनी केलेलं हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियामध्येही बराच शेअर झाला आहे.

माझ्या टॉमीला तू कुत्रा का म्हटलं? कुत्र्याच्या मालकानं शेजाऱ्याला लाठ्या काठ्यांनी केली मारहाण

माझ्या टॉमीला तू कुत्रा का म्हटलं? कुत्र्याच्या मालकानं शेजाऱ्याला लाठ्या काठ्यांनी केली मारहाण

मागील काही दिवसांपासून एक वाक्य तुमच्याही सतत कानावर पडत असेल. त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता? हे वाक्या तुम्हीही बऱ्याचदा ऐकलं असेल. मात्र आता याच वाक्याची अनुभूती देणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये कुत्र्याचं (Dog) नाव टॉमी असतानाही शेजाऱ्यानं त्याला कुत्रा म्हटल्यानं प्रकरण चांगलंच गंभीर झालं आहे. राग अनावर झाल्यानं कुत्र्याच्या मालकानं शेजाऱ्याला थेट मारहाणच केली आहे. ही घटना आहे हरियाणातील गुरुग्राममधील.

गुरुग्रामच्या ज्योती पार्क येथील एका व्यक्तीनं एक कुत्रा पाळला आहे. प्रेमानं त्यानं या कुत्र्याचं नाव टॉमी असं ठेवलं आहे. मात्र, हा कुत्रा अत्यंत आक्रमक असल्यानं अनेकदा तो येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना चावण्यासाठी धाव घेतो. यामुळे आसपासचे नागरिक त्रस्त झाले आहेत. याच कारणामुळे या व्यक्तीच्या शेजारीच राहाणाऱ्या सुधीर यांनी कुत्र्याला साखळीनं बांधण्यास सांगितलं. कुत्र्याच्या मालकाला या गोष्टीचा राग आला नाही की त्याला साखळीनं बांधण्यास सांगितलं, तर या गोष्टीचा राग आला की त्याला कुत्रा का म्हटलं. मग काय, संतप्त झालेल्या मालकांनं सुधीर यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की कुत्र्याच्या मालकानं सुधीर यांना थेट मारहाण करण्यासच सुरुवात केली.

ही मारहणा साधी नव्हती तर लाठ्या काठ्यांनी सुधीर यांच्यावर हल्ला करण्यात आला. कुत्र्याच्या मालकानं केवळ सुधीरवरच नाही तर त्यांच्या कुटुंबातील महिला आणि लहान मुलांवरही हल्ला केला. या घटनेत त्यांना दुखापतही झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सुधीर यांनी याप्रकरणी गुरुग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

दिलासादायक! करोनाबाधित रुग्णसंख्या घसरली आणि मृत्यूच्या संख्येतही घट

दिलासादायक! करोनाबाधित रुग्णसंख्या घसरली आणि मृत्यूच्या संख्येतही घट

दररोज नव्याने दाखल होणारी रुग्णसंख्या आणि दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्या आज मात्र खाली घसरलेली दिसतेय. हीच काय ती दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सोमवारी (१० मे २०२१) ३ लाख २९ हजार ९४२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ५६ हजार ०८२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एका दिवसात ३८७६ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी २९ लाख ९२ हजार ५१७ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ४९ हजार ९९२ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ९० लाख २७ हजार ३०४ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३७ लाख १५ हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी २९ लाख ९२ हजार ५१७
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ९० लाख २७ हजार ३०४
  • उपचार सुरू : ३७ लाख १५ हजार २२१
  • एकूण मृत्यू : २ लाख ४९ हजार ९९२
  • करोना लसीचे डोस दिले गेले : १७ कोटी २७ लाख १० हजार ०६६

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण १७ कोटी २७ लाख १० हजार ०६६ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील २५ लाख ०३ हजार ७५६ लसीचे डोस सोमवारी देण्यात आले.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, १० मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३० कोटी ५६ लाख ०० हजार १८७ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १८ लाख ५० हजार ११० नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात अर्थात सोमवारी करण्यात आली.

Viral! ‘करोना व्हायरस येतोय’; ‘या’ व्यक्तीचे व्हायरल होत आहे सात वर्षांपूर्वीचे असे ट्विट

Viral! 'करोना व्हायरस येतोय' 'या' व्यक्तीचे व्हायरल होत आहे सात वर्षांपूर्वीचे असे ट्विट

करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले असताना एक सात वर्षांपूर्वीचे ट्विट सध्या व्हायरल होत असून त्याची चर्चा सुरू आहे. सात वर्षांपूर्वीचे करोना व्हायरस येतोय असे ट्विट केले होते. मार्को नावाच्या व्यक्तिने @Marco_Acortes या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केले होते. करोनाच्या थैमानाची चर्चा सुरू असताना या ट्विटकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.

@Marco_Acortes या ट्विटर हॅण्डलवरून ३ जून २०१३ रोजी ट्विट करण्यात आले होते. या ट्विटला जवळपास दोन लाखजणांनी रिट्विट केले असून १८ हजारांहून अधिक कमेंट आहेत. तर, दोन लाखांहून अधिकजणांनी हे ट्विट लाइक केले आहे. माक्रोने मार्च २०१३ मध्येच ट्विटवरवर अकाउंट सुरू केले होते. तर, त्याचे शेवटचे ट्विट ११ डिसेंबर २०१६ रोजीचे आहे. या शेवटच्या ट्विटमध्ये स्माइली इमोजी ट्विट केली आहे.

या ट्विट खाली अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यातील काही युजर्सने ट्विट हॅक करून जुन्या तारखेला ट्विट केले असल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी या सात वर्षापूर्वी केलेल्या त्यावेळी कोणी मनावर घेतले होते का, असाही प्रश्न उपस्थित केला आहे.

करोना महासाथीबाबत याआधी अशाच प्रकारे दावे करण्यात आले होते. वर्ष १९८१ मध्ये लिहिलेल्या ‘The Eyes of Darkness’ या कांदबरीत एका विषाणूने धुमाकूळ घातल्याचे वर्णन होते. या विषाणूला वुहान-४०० असे नाव देण्यात आले होते. हा विषाणू जैविक शस्त्र असल्याचे कांदबरीत म्हटले होते.

Nagpur Crime: हत्या करून बालगुन्हेगाराच्या शरीराचे तुकडे

5 Men Booked For Duping Of Rs 20.46 Lakh In Land Deal In Hudkeshwar

नागपूर: हिंगणा मार्गावरील मेट्रो स्टेशनमागील टेकडीवर आढळलेल्या मानवी सांगाड्याच्या रहस्यावरून पडदा उठला आहे. हत्या करून बालगुन्हेगाराच्या शरीराचे तुकडे करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. डीएनए तपासणीचा अहवाला आला. त्यानंतर मृतकाची ओळखही पटली. सतरावर्षीय मृतक हा एमआयडीसी परिसरात राहायचा. त्याच्याविरुद्ध ११ गुन्हे दाखल आहेत.

जानेवारी २०२०मध्ये बाजारात जात असल्याचे सांगून हा बालगुन्हेगार घरून निघाला. मात्र, घरी परतला नाही. त्याच्या आईने एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. जानेवारीत टेकडीवर मानवी सांगाड्याचे तुकडे आढळले. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला. तुकडे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले. तुकडे मानवाचे असून, त्याचे वय १२ ते १७दरम्यानचे असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. बालगुन्हेगारही बेपत्ता असून तो १७ वर्षांचा असल्याचे पोलिसांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. एमआयडीसी पोलिसांनी डीएनए चाचणीचा निर्णय घेतला. पोलिसांनी बालगुन्हेगाराच्या आई-वडिलांचे नमुने तसेच मृताच्या हाडाचे, कवटीचे तुकडे व चार दात डीएनए तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. डीएनए सारखेच असून, नमुने मृतकाच्या आई-वडिलांचेच असल्याचे प्रयोगशाळेने ५ मे रोजी स्पष्ट केले. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

स्मार्ट पोलिसांसमोर आव्हान

हायटेक पोलिसांनी रहस्यमय ठरलेल्या एकनाथ निमगडे व मनीष श्रीवास हत्याकांडाचा पर्दाफाश केला. कोटींची सुपारी देऊन निमगडेंची हत्या करण्यात आली. मात्र, सुपारी देणाऱ्याचे नाव अद्यापही गुन्हेशाखा पोलिसांना कळू न शकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता बालगुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. यातील मारेकरी शोधणे स्मार्ट पोलिसांसमोर आव्हान आहे.

तुकडे हत्याकांडाची दुसरी घटना

निर्दयीपणे ठार मारल्यानंतर तुकडे तुकडे करण्यात आल्याची उपराजधानीतील ही दोन वर्षांतील ही दुसरी घटना होय. ऑगस्ट २०१९ मध्ये तुकडे तुकडे करून सुधाकर देवीदास रंगारी ऊर्फ जेम्स बॉण्ड (वय ४८, रा. आवळेनगर, जरीपटका) याची हत्या करण्यात आली. तुकडे पोत्यात भरून ते गांधीसागरमध्ये फेकण्यात आले. त्यानंतर आता एमआयडीसीत हत्या करून बालगुन्हेगाराच्याही शरीराचे तुकडे करण्यात आले. या प्रकरणाचा तपासही हायटेक गुन्हेशाखेकडे जाण्याची शक्यता आहे.

सुजलचा सुगावा लावण्यात अपयश

रहस्यमय हत्याकांडाचा उलगडा करण्यात हातखंडा असलेली हायटेक गुन्हेशाखा चार वर्षांनंतरही बेपत्ता सुजल वासनिकचा सुगावा लावण्यात अपयशी ठरली. सप्टेंबर २०१७मध्ये लिहिगाव येथील सुजल बेपत्ता झाला. दहा लाखांच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण झाल्याचे त्यावेळी समोर आले. याप्रकरणात सुनील मडावी व रामदास मडावी या दोघांना अटकही करण्यात आली. रामदासने पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुजल बेपत्ता झाला त्याचदिवशी कामठी पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली असती तर तो सापडला असता. बंदोबस्तात व्यस्त असल्याचे कारण त्यावेळी या अधिकाऱ्याने दिले. चार वर्षांनंतरही हे प्रकरण रहस्यमयच आहे. याला तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे बोलले जाते.

Coronavirus in Nagpur: जिल्ह्यात करोनाबाधितांच्या आकडेवारीत घट कायम

Coronavirus in Nagpur: जिल्ह्यात करोनाबाधितांच्या आकडेवारीत घट कायम

जिल्ह्यात करोनाबाधितांच्या आकडेवारीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घट रविवारीही कायम होती. दिवसभरात ६,५४४ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८६ टक्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यातुलनेत दिवसभरात ३,१०४ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. तर ७३ मृत्यू नोंदवण्यात आले. शनिवारीही बाधितांच्या तुलनेत अर्ध्याहून अधिक रुग्ण बरे झाले होते.

काही दिवसांपूर्वी सुमारे आठ हजारांच्या आसपास दररोज नोंदवण्यात येणारी जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून खाली आहे. रविवारी शहरात १,६१४, तर ग्रामीणमध्ये १,४७९ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात ६,५४४ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही घट बघायला मिळत आहे. रविवारी जिल्ह्यात ५४ हजार ७३२ अॅक्टिव्ह रुग्ण होते. आतापर्यंत ३ लाख ८६ हजार २०१ रुग्ण करोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात १७ हजार ८३५ चाचण्या करण्यात आल्या.

रविवारी शहरात ४७, तर ग्रामीणमध्ये १५ मृत्यू नोंदवण्यात आले. जिल्ह्याबाहेरील रुग्णांच्या ११ मृत्यूंचाही यात समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे ८ हजार १४२ मृत्यूंची नोंद करण्यात आली.

जिल्ह्याची स्थिती

रविवारचे बाधित : ३,१०४

रविवारी बरे झालेले : ६,५४४

रविवारचे मृत्यू : ७३

अॅक्टिव्ह रुग्ण : ५४,७३२

Coronavirus India: बालकांना लावा मास्क लावण्याची सवय

Coronavirus India: बालकांना लावा मास्क लावण्याची सवय

करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत जात आहे. पहिली लाट ही ज्येष्ठांसाठी घातक ठरली, तर दुसरी लाट ज्येष्ठ आणि तरुणांसाठीही धोकादायक ठरत आहे. अशात तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या १८ वर्षांवरील सर्वांसाठी लस उपलब्ध आहे. मात्र, बालकांचे लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. याबाबत विदेशामध्ये विविध संशोधने सुरू आहेत. पण, अशा स्थितीमध्ये बालकांसाठी मास्क आणि इतर सुरक्षा हेच मोठे शस्त्र आहे. लहान मुले मास्क लावत नसल्याची अनेक पालकांची तक्रार असते. दोन वर्षांवरील बालकांना समज आलेली असते. अशात ते पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी स्वत:सुद्धा मास्क वापरावे आणि बालकांना त्यांच्या आकाराचे मास्क देऊन त्यांनाही मास्क लावण्याची सवय लावावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद मंडलिक आणि डॉ. अनिल राऊत यांनी ‘कोव्हिड संवाद’मध्ये दिला.

नागपूर महापालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात डॉ. मंडलिक आणि डॉ. राऊत यांनी ‘बालकांमधील कोव्हिड आणि लसीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले.

लॉकडाउनमुळे मागील वर्षभरापासून लहान मुले घरात बसून आहेत. शाळा, बाहेर जाणे, मित्रांसोबत खेळणे, गप्पा मारणे हे सर्व बंद असल्याने त्यांचा बाहेर कुणाशी संपर्क येत नाही. अशा स्थितीत घरातील मोठे व्यक्ती जे कामानिमित्त वा इतर कारणानिमित्त घराबाहेर जातात व पुन्हा घरात परत येतात त्यांच्याशीच त्यांचा संपर्क येतो. घराबाहेर गेलेली एखादी व्यक्ती करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास बालकांनासुद्धा करोना होऊ शकतो. मात्र, बालकांमध्ये करोनाचे गंभीर लक्षण आढळत नसले तरी ते ‘सुपर स्प्रेडर’ ठरू शकतात. घरातील ज्येष्ठांनाही त्यांच्यामुळे बाधा होऊ शकते. अशा स्थितीत घरातील सर्व मोठ्या व्यक्तींनी सुरक्षेची सर्व काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेरून आल्यानंतर आधी साबण व पाण्याने हात धुवावे, मास्क लावल्यानंतरच बाळाच्या जवळ जावे, असा सल्लाही डॉ. मंडलिक व डॉ. राऊत यांनी दिला.

आई आणि वडील करोना पॉझिटिव्ह असणे व बाळाचा अहवाल निगेटिव्ह असणे किंवा बाळ पॉझिटिव्ह व आई-वडील निगेटिव्ह असणे, असे अनेकदा घडते. अशा स्थितीत बाळाला एकटे ठेवणे शक्य नसते. यावेळी पालक मुलांना थेट आजी-आजोबांकडे सोपवतात. मात्र, इथेच धोका निर्माण होऊ शकतो. बाळ पॉझिटिव्ह असेल व आई निगेटिव्ह असेल, तर त्याची काळजी घेण्यासाठी आईने सोबत रहावे. किंवा बाळ निगेटिव्ह आणि आई-वडील पॉझिटिव्ह असतील तरीसुद्धा बाळाला सोबत ठेवावे. बाळाला स्तनपान करताना आईने मास्क लावावे, स्तनपानानंतर बाळाला स्वत:पासून दूर ठेवावे. स्तनपानामुळे बाळाला करोना संसर्ग होत नाही. तसेच गर्भवती महिला करोनानाबाधित असेल तरीसुद्धा बाळाला करोना होत नाही. बाळाच्या आमोरासामोरच्या थेट संपर्कामुळेच करोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मास्क हे सुरक्षेचे मोठे शस्त्र आहे. घरातील सर्व व्यक्तींनी मास्क लावून बाळांना त्याचे अनुकरण करण्यास शिकवावे. आजघडीला सुरक्षा हेच सर्वोत्तम औषध आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन डॉ. मंडलिक व डॉ. राऊत यांनी केले.

पत्नीने आधी पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या, नंतर विजेचे झटके देऊन केली हत्या…

पत्नीने आधी पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या, नंतर विजेचे झटके देऊन केली हत्या

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात पती दगा देत असल्याच्या संशयावरून प्राध्यापिक असलेल्या ६१ वर्षीय पत्नीने ६३ वर्षीय डॉक्टर पतीची हत्या केली. पोलिसांनी हत्येप्रकरणी महिलेला अटक केलीये. पोलिसांनी सांगितले की, पत्नीने आधी पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि नंतर त्याला विजेचे झटके देऊनन त्याची हत्या केली.

छतरपूरच्या जिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर नीरज पाठक यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना पत्नीनेच दिली होती. ही जिल्ह्यातील हाय प्रोफाइल केस होती. त्यामुळे पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. एक एक धागा जोडत पोलिसांनी आरोपीची माहिती मिळवली.

डॉक्टरच्या पत्नीने सांगितलं की, ती झांसीला गेली होती आणि जेव्हा परत आली तर पतीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, डॉक्टरचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेहाचं पोस्टमार्टेम केलं तर त्यात डॉक्टर नीरज पाठक यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचं आढळून आलं. पोलिसांनी पत्नीवर आधीपासून संशय होता.

कारण पती-पत्नीमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. ज्यानंतर पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यावर पोलिसांनी पत्नीची कसून चौकशी केली. तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला.

छतरपूर जिल्ह्याचे डीएसपी शशांक जैन यांनी सांगितले की, पत्नी ममता पाठक यांनी पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले की, तिचा आणि पतीचा अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.

तिला संशय होता की, डॉक्टर नीरज पाठक हे तिच्या जेवणात असे काही पदार्थ मिक्स करत होते ज्याने तिला मानसिक विकाराची लक्षणे दिसत होती.

तेच आरोपी ममता पाठकने संधी मिळताच २९ एप्रिलला डॉक्टर नीरज पाठकच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि त्याला बेशुद्ध केलं. ज्यानंतर तिने त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन हत्या केली.

डीएसपी शशांक जैन म्हणाले की, कुणालाही संशय येऊ नये म्हणून पतीचा मृतदेह घरीच सोडून आरोपी ममता पाठक झांसीला गेली आणि तेथून परत येऊन १ मे रोजी स्वत:च पतीच्या हत्येची एफआयआर दाखल केली.

पोलिसांना तपासादरम्यान आढळून आलं की, पत्नीने एकटीनेच हे हत्याकांड केलं. पोलिसांनाही दुसऱ्या कुणाचे काही पुरावे मिळाले नाहीत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी ममता पाठकला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे.

धक्कादायक ! कोविडमधून बरे झाल्यानंतर १० रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण

कोविडमधून बरे झाल्यानंतर १० रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लागण

चंद्रपुर: कोविडमधून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य गंभीर आजार जडलेल्या १० रुग्णांची चंद्रपुरात रविवारी नोंद झाली. हे रुग्ण शहरातील विविध खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. कोविड रुग्णांवर ऑक्जिसन थेरपी करताना चुका झाल्यास चंद्रपुरात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू शकतात, असा इशाराही जिल्हा आरोग्य विभागाने दिला आहे.

कोविडमधून बरे झालेल्यांपैकी १० रुग्णांमध्ये डोळे व नाकात अनिष्ठ परिणामाच्या तक्रारी कुटुंबियांनी संबंधित डॉक्टरांकडे केल्या. नाकाभोवतीच्या मोकळ्या जागेत ही बुरशी जागा धरून राहाते. नाकातून सतत स्त्राव होणे, तीव्र डोकेदुखी व एखादी बाब दोनदा दिसून येणे, अशी लक्षणे आढळली. डॉक्टरांना ही माहिती दिल्यानंतर हा म्युकरमायकोसिस आजार असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी उपचारही सुरू केला. सध्या प्रकृती ठीक असल्याची माहिती एका रुग्णाच्या कुटुंबाने दिली.

यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्याशी संपर्क साधला असता म्हणाले, चंद्रपुरात म्युकरमायकोसिस झालेल्या ११ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. हे रुग्ण शासकीय नव्हे; तर शहरातील खासगी कोविड हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत होते. रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणाऱ्यांना याचा त्रास होत नाही. परंतु, रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास घातक आहे. त्यामुळे डॉक्टरांनी अनावश्यक स्टेरॉईड देऊ नये. ऑक्सिजन थेरपीकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, असा सल्लाही डॉ. राठोड यांनी दिला आहे.

900-bed, 25 oxygen plants to be set up at Mankapur to fight third Covid wave

900-beds, 25 oxygen plants to be set up at Mankapur to fight third Covid wave

Nagpur: The COVID second wave has created havoc worldwide putting the center, state government and health workers in distress. Looking at the intensity experts are of the view that the third wave could also be equally devastating.

Learning from the amount of disturbance and loss of life caused due to bed, oxygen and medicine crisis, the district administration held a meeting on Saturday to discuss the issues to fight in case of third wave. The discussion during the meeting led to set up a 900-bed Jumbo hospital and 25 oxygen plants at Mankapur Sports Complex.

Guardian minister Nitin Raut directed the authorities to prepare a master plan to tackle the third wave of Covid. District collector Ravindra Thakare, municipal commissioner Radhakrishnan B, ZP CEO Yogesh Kumbhejkar, director of Directorate General of Information and Public Relations Hemraj Bagul, dean of GMCH Dr Dr Sudhir Gupta, Dean of IGGMCH Dr Ajay Keoliya, medical superintendent Dr Avinash Gawande, deputy director, Health Department Dr Sanjay Jaiswal, district surgeon Dr Devendra Paturkar, president of IMA Dr Sanjay Deotale, all the officers of Covid Task Force were present. The availability of beds will depend on the availability of oxygen. Therefore, cryogenic oxy gen plants would be set up at ten places in the district. Around 5,000 jumbo cylinders should be made avail able for corona patients and 1000 oxygen concentrators would be procured.

Therefore, work with the objective of separate oxy gen supply in each major hospital and meet the tar get of 10,000 tests per day, Raut said. Covid Care Centers in each tehsil will be upgraded. Pay attention to this to reduce stress on GMCH, Mayo AIIMS and other private hospitals in the city.

Ambedkar Hospital, ESIC Hospital and Haj House in Indore area, will be upgraded as well as Koradi, Kamptee, Ramtek, Mouda, Umred and Katol hospitals in rural areas will also be upgraded. The state government will soon direct local doctors in urban and rural areas to take care of home quarantine patients.

They will also be paid honorarium for this. Excessive use of Remdesivir and some other drugs have shown side effects in many patients. Therefore, action will be taken against doctors who do not follow the treatment protocol.

District collector Thakare said that now a team of officials will visit villages to increase awareness about vaccination and ensuring mass vaccination. However, he also suggested that attention be paid to the health facilities and infra structure in the village. Strict action against lab owners and staff who issue bogus RT-PCR report and those involved in black marketing of Remdesivir.

Here are some of the Key highlights of the Hospital:

  • A 900-bed Jumbo hospital at Mankapur soon
  • Cryogenic oxygen plants to be set up at 10 places
  • 15,000 jumbo cylinders will be available
  • 10,000 tests per day 1,000 oxygen concentrators will be purchased
  • Tehsil level Covid Centers to be made robust
  • Upgradation of Ambedkar, ESIC, Haj House hospitals
  • Upgradation of Koradi, Kamptee, Ramtek, Mouda, Umred & Katol hospitals
  • Creation of task force to save children
  • Local doctors to take care of home quarantine patient
  • Action against doctors who do not follow treatment protocol
  • Officials to visit villages to increase vaccination
  • Order to the police to seal district borders
  • Strict action against black marketers of Remdesivir
  • Action on laboratories reporting bogus RT PCR.

Nagpur Weather

Nagpur
haze
24 ° C
24 °
24 °
50 %
1kmh
20 %
Mon
36 °
Tue
37 °
Wed
38 °
Thu
37 °
Fri
36 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...