Nagpur news: वीज वसाहत परिसरात आढळले नवजात शिशु

Nagpur news: वीज वसाहत परिसरात आढळले नवजात शिशु

काेराडी : वीज वसाहत परिसरातील साेपाेरेक्स काॅलनीत उजाड ठिकाणी सिमेंट ओट्यावर नवजात शिशु आढळून आले. ही घटना मंगळवारी (दि.११) सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, पाेलिसांनी एका कुमारी मातेला ताब्यात घेतले असून, शिशु व कुमारी मातेला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळच्या सुमारास माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी लगेच काेराडी पाेलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. नवजात शिशु एक दिवसाचे असून, पाेलिसांनी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. स्त्री लिंगी असलेल्या शिशुची प्रकृती चांगली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. वीज वसाहतीचा साेपाेरेक्स काॅलनीचा भाग निर्जन आहे. या ठिकाणी वसाहत नाही. या नवजात बालकाच्या निर्दयी मातापित्याचा शाेध घ्यावा, अशी मागणी विविध स्तरातून झाली. तपासादरम्यान प्राप्त पुराव्याच्या आधारे पाेलिसांनी काही वेळेतच प्रकरणाचा छडा लावत एका कुमारी मातेला ताब्यात घेतले असून, तिच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पाेलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात काेराडी पाेलीस तपास करीत आहेत.