नागपूर: केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयातर्फे १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्वच्छता अभियान स्पर्धेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. यात, इंदूर शहराने आपले प्रथम स्थान कायम राखले आहे. तर नागपूरने ५७ व्या स्थानावरुन झेप घेत १८ वा क्रमांक मिळविला तर राज्यात पाचवा क्रमांक पटकावला.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी २९ क्रमांकाने झेप घेतली आहे.
राज्यात नवी मुंबई प्रथम क्रमांकावर असून नाशिक दुसरा, ठाणे तिसरा तर पुणे शहर चौथ्या क्रमांकावर आहे.
इंदूर शहराने देशात पहिला क्रमांक कायम ठेवला. सुरत दुसऱ्या तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कें द्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयातर्फे नागपूरसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये स्वच्छता सर्व्हेक्षण करण्यात आले. केंद्रीय पथकाच्या पाहाणी नंतर केंद्रीय नगरविकास मंत्रालयातर्फे निकाल जाहीर करण्यात आला.