दुचाकीची मोपेडला धडक; दोघे गंभीर

Nagpur

Nagpur: भरधाव मोटरसायकलस्वाराने मोपेडला धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तात्या टोपेनगर येथे घडली. या घटनेने परिसरात काही काळ तणावाची स्थिती होती.

जॉन (वय २२, रा. टाकळी, हिंगणा) व सुयश शेंडे (वय २१, रा. खामला रोड) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर मेडिकल कॉलेज Nagpur हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुयश हा मोपेडने (एमएच-३१-ईआर-७१९८ ) तात्या टोपेनगर येथील पेट्रोलपंपावर आला. पेट्रोल भरून तो यू-टर्न घेत होता. याचवेळी लक्ष्मीनगर चौकाकडून जॉन हा भरधाव मोटरसायकल ( एमएच-३१-सीएक्स-८६५१ ) घेऊन आला. त्याने मोपेडला धडक दिली. मोपेड रस्तादुभाजकावर आदळली. दोघेही खाली पडले. हा अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकलचे हॅण्डल तुटले. नागरिकांनी धाव घेतली. एका नागरिकाने ऑटोला थांबविले. जखमींना ऑरेंजसिटी Nagpur हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दोघेही भीषण जखमी असल्याने येथील डॉक्टरांनी त्यांना मेडिकल कॉलेज Nagpur हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. नातेवाइकांनी दोघांना मेडिकलमध्ये दाखल केले.

बजाजनगर पोलिसांची निष्क्रियता

घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. एका नागरिकाने बजाजनगर पोलिस स्टेशनला अपघाताची माहिती दिली. तब्बल एक तासापर्यंत कोणताही पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नाही. अखेर नागरिकानेच ऑटोचालकाला थांबविले. ऑटोने जखमींना ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बजाजनगर पोलिसांच्या या निष्क्रियतेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. दुपारी घडलेल्या या घटनेची कोणतीही माहिती रात्री ९ वाजतापर्यंत बजाजनगर पोलिसांना नव्हती. जखमींचे नातेवाईक आले नाहीत. त्यामुळे जखमींची नावेही येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती नव्हती. दरम्यान, बघ्यांची गर्दी जमल्याचा फायदा घेत चोरट्याने एका नागरिकाचा मोबाइल चोरी केला, असेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले.