सीमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद

मनपा आयुक्तांचे आदेश : दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्गावरील वाहतूक ३० मार्चपर्यंत प्रलंबित

आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्गापर्यंतची वाहतूक सीमेंट रोड बांधकामाकरिता बंद करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ पॅकेज क्रमांक ९ मधील रस्ता क्रमांक ३५ दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्गापर्यंतपर्यंत सीमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावरील डाव्या बाजूची वाहतूक ३० जानेवारी २०२० ते ३० मार्च २०२० पर्यंत बंद राहणार आहे. सदर मार्गावरील वाहतूक उजव्‍या बाजूने व लगतच्या रस्त्यावरून वळविण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. सदरबाबतचे लेखी आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.