उमरेड तालुक्यातील एका फार्म हाऊसमध्ये पावसात अडकलेल्या ( जलवेढ्यातून ) २२ जणांची सुटका

Date:

नागपूर : उमरेड तालुक्यातील एका फार्म हाऊसमध्ये पावसात अडकलेल्या २२ जणांची एसडीआरएफच्या (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) चमूने बोटीच्या साहाय्याने सुटका केली. नांद नदी आणि वडगाव जलाशयाचे पाणी फार्म हाऊसमध्ये घुसल्याने हे २२ जण मंगळवारपासून जलवेढ्यात अडकले होते.

नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे नांद नदी आणि वडगाव जलाशयाची पातळीत वाढ झाली. नांद नदीचे आणि वडगाव जलाशयाचे पाणी उमरेड तालुक्यातील पिपरा गावातील एका फार्म हाउसमध्ये घुसल्याने २२ जण येथे अडकले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी, महसूल प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी रवाना झाले. बुधवारी सकाळी या २२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

…तर इथे करा संपर्क

भिवापूर आणि उमरेड तालुक्यातील चार गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला होता. किछलापार, चिखली या गावातील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले. नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी केले.

पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अनेकदा अशी वेळ येते की, मनुष्य पोहोचू शकत नाही. अशावेळी आपत्तीचे स्वरूप काय आहे, याचा आढावा घेण्यासाठी ड्रोनसारखे यंत्र आपत्ती निवारण कक्षाकडे असणे आवश्यक आहे. ड्रोनच्या साहाय्याने आपत्तीची तीव्रता लक्षात घेऊन आपत्ती ओढवलेल्यांचा बचाव करणे सोईचे ठरेल, त्यामुळे राज्य शासनाकडे याची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष : १०७७ / २५६२६६८

१५ शोध व बचाव पथक तयार

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शोध व बचाव पथकाची एक चमू तैनात करण्यात आली आहे. शहरातील १ चमू यासह एकूण १५ चमू यासाठी काम करणार आहेत. हिंगणा मार्गावरील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना आपत्ती निवारणासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.

महसूल विभागाकडील साहित्य

लाइफ जॅकेट : ५०

बोट : ४

इनफ्लेबल लाइट : १०

हेडलाइट : १२

स्कुबा डायव्हिंगचे साहित्यच नाही

पूरपरिस्थितीत कुणी खोलगट भागात अडकले असेल किंवा डोहात अडकले असेल तर त्यांना बाहेर काढण्यासाठी स्कुबा डायव्हिंगमध्ये प्रशिक्षित असलेल्यांची गरज भासते. केवळ पोहत जाऊन त्यांना बाहेर काढणे शक्य होत नाही. राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफकडे स्कुबा डायव्हिंगमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ आहे, मात्र त्यांच्याकडे स्कुबा डायव्हिंगसाठी साहित्यच नसल्याने बचाव मोहीम राबविता येत नाही. स्कुबा डायव्हिंगचे साहित्य मिळावे, यासाठी मागणी करण्यात आली आहे.

१०० लाइफ जॅकेट हवे

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडे केवळ १२ लाइफ जॅकेट आहेत. आपत्ती निवारणासाठी किमान १०० लाइफ जॅकेटची गरज आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे एसडीआरएफकडून सांगण्यात आले.

‘एसडीआरएफ’वर महत्त्वाची जबाबदारी

कमांडिंग ऑफिसर प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कमांडन्ट सुरेश कराळे यांच्या नेतृत्वात एसडीआरएफची चमू सज्ज झाली आहे. एसडीआरएफकडे चार चमू आहेत. १ प्रशासकीय आणि ३ प्रत्यक्ष कृती करणाऱ्या चमू आहेत. एका चमूमध्ये २५ जवानांचा समावेश आहे. एसडीआरएफकडे आरआरबी बोट १२ आणि ओबीएम १२ आहे. फ्लड वॉटर रेस्क्यू चमू तयार आहे. यात लाइफ बॉय, लाइफ जॅकेट, पोहण्यात तरबेज असणारे व्यक्ती, रोप आदी साहित्यानिशी ही चमू तयार असते. एनडीआरएफच्या चमूकडून इथल्या चमूला प्रशिक्षण देण्यात आले. फ्लड अॅण्ड सायक्लॉन ट्रेनिंग, स्कुबा डायव्हिंग, केमिकल फॅक्टरीत आपत्ती आली तर बचाव कसा करायचा, मोठी इमारत पडली आणि त्या इमारतीच्या मलब्यात अडकलेल्यांना बाहेर कसे काढायचे याचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे. या विभागाकडे ५५ वॉकीटॉकी आणि २८ बिनतारी व्हीएचएफ संच आहेत.

अधिक वाचा : Scholarship issue : Scholarship fiasco continues, NCPI mapper creates problems

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...

Best places in India for summer

Looking for the best places to visit in summer,...

Top 10 best summer visiting place in India

India has the top summer vacation places to be...

Celebrate Mahavir Jayanti 2025: A Tribute to the Spiritual Guide of Jainism

Who was Lord Mahavir? Mahavir Jayanti is celebrated as the...