मुंबई 04 ऑगस्ट : राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील चार लाख परीक्षार्थी दोन वर्षांपासून या परीक्षेची चातकासारखी वाट बघत असतानाच आता अखेर सरकारनं परीक्षेच्या तारखांची घोषणा ((MPSC Exam 2021 Date Declared) केली आहे. एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा 11 एप्रिल 2021 रोजी होणार होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता 4 सप्टेंबर 2021 रोजी या परीक्षा होणार (MPSC Exam 2021 Date) आहेत.
2020 मध्ये होणारी ही संयुक्त पूर्व परीक्षा 6 वेळेस पुढे ढकलली होती. 806 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. PSI/ STI/ASO या पदांसाठी ही परीक्षा होत आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभा कमी होताच राज्य व केंद्र शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. अशात आता एमपीएसचीच्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीखही जाहीर करणार आली आहे.
एमपीएससीच्या परीक्षार्थींनी 9 ऑगस्टपर्यंत परीक्षेची तारीख जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आता आयोगाला जाग आली आहे. ‘कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थिती संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनच्या अनुषगांने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतच माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येईल’, असं परिपत्रकातून सांगण्यात आलं आहे.
कोणत्या पदासाठी किती जागा –
सहायक कक्ष अधिकारी – MPSC ASO – 67 जागा
राज्य कर निरीक्षक – MPSC STI – 89 जागा
पोलीस उप निरीक्षक – MPSC PSI – 650 जागा
एकूण – 806 जागा