मेट्रोच्या ट्रेलरने कामगारांना चिरडले

नागपूर

नागपूर : मेट्रो रेल्वेच्या ट्रेलरने दोन कामगारांना चिरडून ठार केले. ही घटना शनिवारी रात्री वर्धमाननगरमधील पॉवर हाउस चौकात घडली. होरीलाल रामविलास वर्मा (वय २८) व व नरेश इतवारी शाहू (वय ३५, दोन्ही रा. डिप्टी सिग्नल) अशी मृतकांची नावे आहेत. ते भंडारा मार्गावरील कारखान्यात कार्यरत होते.

शनिवारी काम आटोपून दोघेही एमएच-४९-एबी-२६३७ या क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होते. वर्धमाननगरमधील पॉवर हाउस चौकात मेट्रो रेल्वेचे लोखंड घेऊन जाणाऱ्या एमएच- ०२- क्यू- ७०५३ या क्रमांकाच्या ट्रेलरने मोटरसायकलला धडक दिली. मागील चाकात येऊन दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. मोटरसायकल आधी रस्तादुभाजकावर आदळली. अनियंत्रित झाल्याने दोघे खाली पडले. ट्रेलरच्या मागील चाकात आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ट्रेलर चालकाची चूक नव्हती, असे मेट्रो रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

अधिक वाचा : नागपुरात गुंड प्रवृत्तीच्या एकाची हत्या, आरोपी फरार