नागपुरात गुंड प्रवृत्तीच्या एकाची हत्या, आरोपी फरार

नागपूर

नागपूर : शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीची हत्या झाली आहे. दुपारी ४ च्या सुमारास राऊत चौकात ही घटना घडली. पिंटू थवकार असे मृताचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पिंटूला बघितले असता तो मृत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली असता ४ आरोपींनी त्याची हत्या करून घटनास्थळावरून पलायन केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

मृत पिंटू हा देखील गुंड प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर पाचपावली पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद होती. मृताची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता सूड घेण्याच्या भावनेनेच ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यासंदर्भातील पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक वाचा : प्रेमप्रकरणातून १४ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या