महापौर नंदा जिचकार सॅनफ्रॅन्सिस्कोला रवाना

महापौर नंदा जिचकार

नागपूर : ‘गोल्बल कोवेनंट ऑफ मेअर फॉर क्लायमेट ॲण्ड एनर्जी ( Global Covenant of Mayors for Climate & Energy) या संस्थेच्यावतीने सॅनफ्रॅन्सिस्काला १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान हवामान आणि ऊर्जेच्या बदलासंदर्भात आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी महापौर नंदा जिचकार या मंगळवारी (ता.११) सॅनफ्रॅन्सिस्कोला रवाना झाल्या.

या परिषदेत ‘हवामान आणि वातावरण’ या संदर्भात विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत महापौर नंदा जिचकार या दक्षिण आशियाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या परिषदेमध्ये नागपूरमध्ये वातावरण बदलासंदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांसंदर्भात त्या सादरीकरण करतील.

अधिक वाचागणेश विसर्जन साठी मनपा यंत्रणा सज्ज ठेवा!