मराठा क्रांती मोर्चा : मराठा तरुणाची आत्महत्या, राज्यातील सातवा बळी

Date:

बीड : मराठा आरक्षण मागणीचा जिल्ह्यात पहिला आणि राज्यातील सातवा बळी मंगळवारी (ता. ३१) गेला. अभिजित बालासाहेब देशमुख (वय ३५, रा. विडा, ता. केज) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.

विज्ञानातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेला अभिजित देशमुख नोकरी नसल्याने अस्वस्थ होता. त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांवर बँकेचे कर्जही थकीत होते. आरक्षण न दिल्याने नोकरी नाही आणि व्यवसाय करण्यासाठी बँकेचे कर्जही मिळत नसल्याचे तो मित्रांशी बोलत होता.

दरम्यान, सध्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग घेतला. आरक्षण मागणीसाठी सहा बळी गेल्यानंतर “मी देखील या लढाईतील शिपाई असून बलिदान देणार” असल्याचे त्याने सोमवारी रात्रीही बोलून दाखविले होते असे डॉ. धनराज पवार यांनी सांगितले.

अभिजित देशमुख याने मंगळवारी सकाळी घराजवळील एक झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधी खर्च या कारणाने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. केज पोलीस ठाण्याचे जमादार ढाकणे यांनी पंचनामा लेला असून त्यातही तसा उल्लेख आहे.

अधिक वाचा : रस्त्याच्या मधोमध असलेल्या पोल ला पालकमंत्री यांचे पोस्टर लावण्याची शहर युवक काँग्रेस ची चेतावनी

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

New Announcement by Meta: Changing WhatsApp Business Pricing

Meta has officially announced significant updates to WhatsApp Business...

Pioneering Global Excellence: DMIHER’S Maiden Performance in Times Higher Education (THE) World University Rankings 2025

"DMIHER Achieves Global Milestone: Debut Performance in Times Higher...

Building on Decades of Cooperation: Länd Here Campaign Invites Skilled Workers From Maharashtra to Germany’s Baden-württemberg

Decades of Partnership: Länd Here Campaign Welcomes Skilled Workers...