रस्त्याच्या मधोमध असलेल्या पोल ला पालकमंत्री यांचे पोस्टर लावण्याची शहर युवक काँग्रेस ची चेतावनी

नागपुर

नागपुर :- नागपूर शहर युवक काँग्रेस चे अनोखे आंदोलन अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी बाबा शेळके व दक्षिण नागपूर युवक काँग्रेस अध्यक्ष चक्रधर भोयर यांच्या नेतृत्वात महाल येथे आज करण्यात आले. या आंदोलनाचा उद्देश नागपूर शहरात महानगर पालिका,ना.सु.प्र यांच्या अंतर्गत व वाहतुकीला अडथळे येणारे मंदिर,बुद्ध विहार, मज्जीद,चर्च इत्यादी तोडण्याचा जो सपाटा सुरू आहे त्या विरोधात करण्यात आले.

नागपुरनागपुर शहरातील अति प्राचीन व दुर्लभ मंदिराचा, बुद्धविहार, मज्जीद, चर्च यांच्याही समावेश आहे. नागपूर शहरात मा.श्री.नितीन गडकरी यांच्या प्रभागातच कोतवाली पोलीस स्टेशन, मुख्य बाजार चौकात, महानगर पालिकेच्या हाऊस जवळ मधोमध एक विजेचा मोठा खांब आहे. आपल्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः ऊर्जा मंत्री आहेत यांच्या निवास नागपुर मधे आहे. स्वतः मुख्यमंत्रीची नगरी स्मार्ट सिटी मध्ये नागपूर चा विकास करीत आहे परंतु यांना मुख्य मार्गावरील येणारे विद्युत पोल दिसत नाही का? की फक्त मंदिरच दिसतात असा प्रश्न शहर युवक काँग्रेस ने सरकार ला विचारला आहे.

नागपुररस्त्याच्या मधोमध असलेल्या पोल ला युवक काँग्रेस कडून “विद्युत बाबा”असे नाव देण्यात आले व युवक काँग्रेस तर्फे आरती ओवाळण्यात आली युवक काँग्रेस ने चेतावणी दिली की 7 दिवसात रस्त्यावरील मधोमध लागलेले पोल जर बाजूला केले नाही तर मा. पालकमंत्री यांचे पोस्टर लावून नागपुर शहरातील इलेक्ट्रिक पोलवर हार घालून त्यांची आरती ओवाळण्यात येईल.

हे अनोखे आंदोलन करतांनी इथेही पोलीसांची दडपशाही सुरूच होती 17 युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात प्रामुख्याने चक्रधर भोयर,स्वप्नील ढोके, अखिलेश राजन, अक्षय घाटोळे, वसीम शेख, मिलिंद धवड, सौरभ शेळके, रोहित खैरवार,फजलूर कुरेशी, बाबू खान,अतुल मेश्राम,प्रफुल्ल इझनकर, राज बोकडे, स्वप्नील बावनकर,सागर चव्हाण, अमेय पराते,जानू खोब्रागडे, आशिष लोणारकर, प्रज्वल ठाकरे, दुर्गेश हिरणेकर, नितीन जुमले, पियुष खडगी, अभिषेख धोटे, वृषभ धुडेव शेकडो युवक काँग्रेसी प्रामुख्याने उपस्थित होते.

अधिक वाचा : उत्तर नागपुरातील विकास कामांना गती द्या : वीरेंद्र कुकरेजा