नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, शनिवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होईल. हा निकाल mahresult.nic.in यासह इतर वेबसाइटवर पाहता येईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या दहावी निकालाच्या तारखांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पूर्णविराम देत याबाबत शुक्रवारी अधिकृत घोषणा केली.
मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. मंडळाने सन २०१५मध्ये ८ जून, २०१६मध्ये ९ जून, २०१७ मध्ये १३ जून, २०१८ मध्ये ८ जूनला निकाल जाहीर केला होता. बीएसएनएल ग्राहकांना ‘MHSSC (स्पेस) सीट नंबर’ टाकून ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस करून निकाल मिळवता येईल.
या वेबसाइटवर पाहा निकाल :
maharashtraeducation.com
mahresult.nic.in
mahahsscboard.maharashtra.gov.in
अधिक वाचा : पतीच्या ३० टक्के पगारावर पत्नीचा हक्क : कोर्ट