मोठा पणती टोळक्याचा धुडघूस; सिगारेट दिली नाही म्हणून पेट्रोल टाकून घर पेटवून दिले

Date:

पुणे : शहरातील हांडेवाडी रोडवरील सय्यदनगर, चिंतामणीनगर परिसरात मोठा पणती टोळक्याने धुडघूस घालत पानटपरी चालकाचा गळा दाबला. पेट्रोल टाकून घर पेटवून खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर या टोळक्याने दोन दुकानावर दरोडा टाकत गल्ल्यातील रोकड जबरदस्तीने चोरली. पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍याला मारहाण करुन मॅनेजरच्या केबीनमध्ये घुसून तोडफोड केली.

याप्रकरणी वानवडीपोलिसांनी नोमन सय्यद व मोठा पणती ऊर्फ रिझवान शेख (रा. चिंतामणीनगर, हडपसर) या दोघांना अटक केली आहे. या घटना सोमवारी सकाळी सात ते रात्री एक वाजण्याच्या दरम्यान घडल्या आहेत. नोमन सय्यद, मोठा पणती, आत्तु अन्सारी या तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरदी चोरी, दरोडा, दहशत निर्माण करणे असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी आरिफ रफिक सय्यद (वय ३३, रा. चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. नोमन व आत्तु या दोघांनी आरिफ यांच्या वडिलांच्या पान टपरीच्या लोखंडी बॉक्सवर दगड मारुन शिवीगाळ केली. त्यांना सिगारेट मागितली परंतु, लॉकडाऊनमुळे टपरी बंद असल्यामुळे सिगारेट नसल्याचे वडिलांनी सांगितले. त्यावर या दोघांनी त्यांच्या वडिलांना साले बुढे हमको सिगारेट नही देता, असे म्हणून खाली पाडून त्यांचा गळा दाबला. त्यामध्ये ते बेशुद्ध पडले. आरिफ यांनी त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान आरिफ यांनी वडिलांवर उपचार करुन त्यांना घरी घेऊन आले. ते घराबाहेर थांबले असताना हे दोघे परत तेथे आले. त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन आम्ही इथले भाई असून दररोज फुकट सिगारेट देण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी कमरेला लावलेला कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. आरिफ हे हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्यावर दहशत रहावी, म्हणून घरात इतर लोक असताना व त्यांचा जीव जाईल हे माहिती असताना पेट्रोल टाकून घर पेटवून दिले.

दुसर्‍या घटनेत सागर राजकुमार राठोड (वय २०, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. चिंतामणी अमृततुल्य या चहा दुकानात ते सकाळी ७ वाजता काम करीत होते. त्यावेळी नोमन, मोठा पणती व आत्तु हे तिघे तेथे विनामास्क आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील ८०० रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. तेथील मगर पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. पंपावरील मॅनेजरच्या रुममध्ये शिरुन तोडफोड करुन मॅनेजर बाळू अंभोरे यांना मारहाण केली.

तिसर्‍या घटनेबाबत केवळराम लादुराम परमार (वय ४१, रा. चिंतामणी नगर) यांनी फिर्याद दिली आहे. ते सकाळी साडेसातच्या सुमारास नवदुर्गा किराणा मालाच्या दुकानात काम करत होते. त्यावेळी हे तिघे जण आले. त्यांनी परमार यांना उलट्या कोयत्याने मारहाण केली. काऊंटरवरील साहित्य रस्त्यावर पाडून नुकसान केले. गल्ल्यातील ३ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरुन नेली. या प्रकरणात पोलिसांनी तीन गुन्हे दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Dalmia Cement: Now The RCF Expert! Welcoming Ranveer Singh As Brand Ambassador!

To extend its legacy of technical excellence to home...

Yellow Fever Vaccination in Maharashtra

Yellow Fever Vaccination Maharashtra Yellow Fever Vaccination Maharashtra, if you're...

Dominate the Digital Space: Unveiling the Top Facebook Ads Agency in India

Are you a business owner in India looking to...