सिलिंडरचा भडका

Date:

नागपूर : एकीकडे उन्हाचा भडाका उडालेला आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरणदेखील तापत आहे. सर्वत्र गरमागरमीचा माहोल सुरू असतानाच घरगुती गॅस सिलिंडरचादेखील भडका उडाला आहे. गेल्या दोन महिन्यांत ४७ रुपयांची दरवाढ झाली आहे.

जानेवारी महिन्यापासून सातत्याने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये चढ-उतार दिसून आले. डिसेंबर २०१८मध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर ८६१.८७ रुपये होते. त्यानंतर हे दर घटून जानेवारी २०१९मध्ये ७३८.४५ रुपये झाले.

फेब्रुवारीतही दर कमी होण्याची क्रम सुरू होता. पण, अचानकपणे मार्च महिन्यात दरवाढ झाली. तब्बल ४२ रुपये ५० पैशांची वाढ होत मार्चमध्ये सिलिंडरचे दर ७४७.५० रुपयांवर गेले. दरवाढीचा चढता क्रम एप्रिलमध्येही सुरू आहे. सणवार आणि लग्नसराईच्या काळात झालेली दरवाढ ग्राहकांना होरपळून टाकणारी आहे.

एप्रिल महिन्यात विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर ७५२.८३ रुपये तर अनुदानितचे दर ५०५.०४ रुपये इतका आहे. एकूण दोन महिन्यांचा विचार करता दरामध्ये झालेली ४७ रुपयांची वाढ सामान्यांचे मासिक बजेट बिघडविणारी ठरत आहे. नवीन आर्थिक वर्षापासून गॅस सिलिंडरची दरवाढ लागू होणार आहे. करात वाढ झाल्यामुळे हे दर वाढवल्याचे तेल कंपन्यांनी सांगितले आहे.

साधारणपणे महाराष्ट्राचा विचार करता नागपुरात सिलिंडरसह सर्व इंधनांचे दर इतर शहरांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे नागपूरकर त्रस्त आहेत. अशा स्थितीत करण्यात आलेली दरवाढ नागरिकांची चिंता वाढविणारा आहे. सन २०१८मध्ये एप्रिल, सप्टेंबर आणि डिसेंबर महिना वगळता उर्वरित वर्षभर सिलिंडरचे दर सातत्याने वाढत राहिले आहेत.

विनाअनुदानित सिलिंडरचे बदलत गेलेले दर

एप्रिल : ७५२.८३ रुपये

मार्च : ७४७.८७ रुपये

फेब्रुवारी : ७०४.९६ रुपये

जानेवारी २०१९ : ७३८.४५ रुपये

डिसेंबर २०१८ : ८६१.८७ रुपये

विनाअनुदानितची दरवाढ

मार्च : ४२.९१ रुपये

फेब्रुवारी : ३३.४९ रुपये

जानेवारी : १२३.४२ रुपये

डिसेंबर २०१८ : १३१.१३ रुपये

नोव्हेंबर : ६२ रुपये

ऑक्टोबर : ५८.५० रुपये

सप्टेंबर : ८ रुपये

ऑगस्ट : ३०.५० रुपये

जुलै : ३५.५० रुपये

जून : ५८.५० रुपये

दोन महिन्यांत ४७ रुपयांनी दरवाढ

अधिक वाचा : At Nagpur, Rahul Gandhi says Narendra Modi speaks lies because he is ‘old and in a hurry’

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Basilar Artery Fusiform Aneurysm – Once Incurable – Treated Successfully Using Novel Flow Diversion Technology

Nagpur : Wockhardt Hospitals Nagpur, a leading health care...

Which Smart TV Should YOU Buy in 2024?

Introduction: As we step into 2024, the world of...

Upstox Bets Big on Bharat Market Aims to Transform Investment Habits

Nagpur : Upstox (also known as RKSV Securities India...