नागपुरात नितीन गडकरी आघाडीवर

नागपूर : नागपुरात भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ५७ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. गडकरींना आव्हान देऊन नागपुरात जोरदार हवा निर्माण करणारे काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर गेले आहेत.

मागील निवडणुकीत भंडारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांना मात देऊन ‘जायंट किलर’ ठरलेल्या पटोले यांना काँग्रेसनं यावेळी नागपूरमधून उमेदवारी दिली होती. पटोले यांनी जातीय गणित मांडून गडकरींपुढं मोठं आव्हान निर्माण केलं होतं. त्यामुळं नागपूरच्या निकालाकडं देशाचं लक्ष लागलं होतं. मात्र, आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत गडकरी आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

तिसऱ्या फेरीअंती जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गडकरी यांना १,५६,०६२ मते, नाना पटोले यांना ९८,७८३ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदारांनी सपशेल नाकारले आहे.

सतराव्या लोकसभेसाठी देशातील ५४३ मतदारसंघात निवडणूक झाली होती. त्यापैकी ५४२ जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. पैशाचा अमाप वापर झाल्याचे सिद्ध झाल्याने तमिळनाडूतील वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी ‘विजेता कोण?’ हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.

अधिक वाचा : गँगस्टरचा भाचा न्यायालयात शरण