चारित्र्याच्या संशयावरून मालेगावात लिव्ह इन पार्टनर महिलेचा महिलेची गाेळी घालून हत्या

Crime in Nagpur नागपूर

मालेगाव : शहरातील संविधाननगरमध्ये अज्ञात व्यक्तीने गुरुवारी दुपारी महिलेची गाेळी घालून हत्या केली. ज्याेती भटू डाेंगरे (४०) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून पाेलिसांनी घटनास्थळावरुन दाेन रिकामे काडतूस जप्त केले अाहे.

जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षक असलेले भटू डाेंगरे पत्नी व दाेन मुलींसह संविधाननगरमध्ये वास्तव्यास अाहेत. दुपारी डाेंगरे कामानिमित्त बँकेत गेले हाेते. दाेन्ही मुली जवळच रहाणाऱ्या मावशीच्या घरी गेल्या हाेत्या. तर ज्याेती डाेंगरे घरात एकट्याच हाेत्या. घराच्या लाेखंडी दरवाजाजवळ उभ्या असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर रिव्हाॅल्व्हरमधून दाेन गाेळ्या झाडल्या. यातील एक गाेळी छातीत घुसल्याने ज्याेती डाेंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखाेर पायी पळत जवळील भिंतीवरून उडी मारून पसार झाला.